कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून; खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:18 PM2024-08-14T12:18:31+5:302024-08-14T12:19:16+5:30

नागपूर, गोवा विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

Kolhapur-Delhi flights from October 27; Information given by MP Dhananjay Mahadik  | कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून; खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती 

कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून; खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती 

कोल्हापूर : कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली.

इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केल्यामुळे कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. २७ ऑक्टोबरपासून ही थेट विमानसेवा सुरू होईल. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रदीर्घ काळापासून कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-गोवा या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्याची मागणी उद्योजक, कारखानदार यांच्याकडून होत होती. कोल्हापूरकरांची ही मागणी पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाईसेवा सुरू होण्याचा प्रस्ताव, सध्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या महासंचालकांकडे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर-दिल्ली थेट विमानसेवा सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

अशी असेल विमानाची फेरी

सकाळी १० वाजून १० मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. त्यानंतर १ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचेल.

गेली काही वर्षे कोल्हापूरहून दिल्लीला थेट विमानसेवा असावी, अशी मागणी होत होती. कोल्हापूरच्या आसपास निपाणीपासून कोकणापर्यंत अनेकांनी याबाबत सूचना केली होती. यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून आता लवकरच ही सेवा सुरू होत आहे. कोल्हापूरहून थेट देशाच्या राजधानीला विमानसेवा झाल्याने कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी ही निश्चित पूरक अशी बाब आहे. - धनंजय महाडिक, खासदार

Web Title: Kolhapur-Delhi flights from October 27; Information given by MP Dhananjay Mahadik 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.