कोल्हापूर : ‘डेंग्यू’ निर्मूलन पथकाने घेतला विसावा, प्रशासनाने घेतला चांगलाच धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:19 PM2018-07-16T16:19:06+5:302018-07-16T16:21:58+5:30
कोल्हापूर शहरात ‘डेंग्यू’ आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन विसावा करणे पसंद केले.
कोल्हापूर : शहरात ‘डेंग्यू’ आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन विसावा करणे पसंद केले.
शहरातील अपार्टमेंट्स आणि मोठ्या इमारतींच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास येताच महानगरपालिका आरोग्य विभागाने दोन दिवसांत ९७ अपार्टमेंट्स आणि इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवून साचलेले पाणी काढण्याच्या सूचना दिल्या.
डेंग्यूच्या निर्मूलनार्थ व्यापक प्रमाणावर मोहीम राबवीत असतानाही त्यावर नियंत्रण न मिळाल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. त्यातूनच या नोटिसा बजावल्या आहेत.
गेले तीन दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने औषध फवारणी करताना महापालिकेच्या यंत्रणेस अडचणी निर्माण होत होत्या. गेल्या दोन आठवड्यांत सुटी न घेता महापालिकेची विशेष पथके डेंग्यू’च्या डासांची उत्पत्ती रोखण्यात प्रयत्न करीत आहेत. पण, रविवारी या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन निवांत राहणे पसंद केले.