कोल्हापूर : भक्तीमय व चैतन्यदायी वातावरणात ‘साई ’ पादुकांचे शिर्डीकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:17 PM2018-09-26T16:17:40+5:302018-09-26T16:21:03+5:30
चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला.
कोल्हापूर : चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला.
कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथील साई दरबारमध्ये शिर्डीस्थित साई पादुकांचे दोन दिवस दर्शनसोहळा साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळाने आयोजित केला होता. बुधवारी दुपारी या पादुकांचे दर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही घेतले. (छाया : दीपक जाधव)
साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साई संस्थान ट्रस्ट (शिर्डी) यांच्या सहयोगातून साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांच्यावतीने कोल्हापूरातील शिवाजी स्टेडीयम येथे उभारण्यात आलेल्या साई दरबारमध्ये साई बाबांच्या पादुका दोन दिवस दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांत हजारो महिला व पुरुष भक्तांनी शिस्तबद्धरित्या रांगा लावून या पादुकांचे दर्शन घेतले. सकाळी सात वाजता पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. १२ वाजून १० मिनिटांनी मधान्ह आरती करण्यात आली. दर्शन सोहळ्यानिमित्त प्रल्हाद व विक्रम प्रस्तुत ‘भक्ती तरंग’ हा साई गीतांचा बहरदार कार्यक्रमाच्या सादरीकरणाने चैतन्यदायी व भक्तीमय वातावरणाची झालर निर्माण केली.
या सोहळ्यास दिलेल्या सहयोगाबद्दल संस्थानतर्फे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान खासदार धनंजय महाडीक व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही पादुकांचे दर्शन घेतले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या पादुका पुन्हा फुलांचा वर्षावात पुन्हा शिर्डीकडे बसमधून मार्गस्थ झाल्या.
यावेळी माजी महापौर रामभाऊ फाळके, माजी नगरसेवक विनायक फाळके, उद्योजक गिरीश शहा,विनायक माने, नगरसेवक सचिन पाटील, प्रशांत माने, दिलीप देसाई, पद्माकर कापसे, मोहन घाटगे, सुभाष जाधव, गुलाब सरनोबत, दिपक मुधाळे, अजित पाटील, उदय महाजन, किरण भट, अनिल पाटील, तानाजी कारंडे, रितेश रामदासी, संदेश खोत, अभिजीत सरोदे आदी उपस्थित होते.