कोल्हापूर : दिनकरची पतौडी खणीत स्कूबा डायव्हींगचे प्रात्यक्षिके, ‘बुलढाणा अर्बन’ ची जीवरक्षकाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:02 PM2018-01-12T17:02:12+5:302018-01-12T17:08:40+5:30
जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली.
कोल्हापूर : जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली.
दिनकर हा गेले अनेक वर्षे आपत्तीत सापडलेल्या नागरीकांची विनामोबदला सेवा करुन त्यांचे प्राण वाचवित आला आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत बुलडाणा अर्बन संस्थेने त्याचा डिसेंबर २०१७ मध्ये विशेष गौरव केला होता. त्यात त्याला त्याच्या जीव रक्षण कामात उपयोगी येणारे आॅस्ट्रेलियन बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्याचे अभिवचन दिले होते. त्यानूसार हे किट शुक्रवारी त्याला दिले. त्याची प्रात्याक्षिके दिनकर याने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे दाखविली.
बुलडाणा अर्बन को-आॅप सोसायटीने दिलेल्या स्कुबा डायव्हिग किट मध्ये रंकाळा तलाव पतौडी खण येथे प्रात्यक्षिके दाखविताना जीवरक्षक दिनकर कांबळे .
यावेळी त्याने १५० फुट खोलपर्यंत जाऊन बुडालेला मृतदेह कसा बाहेर काढला जातो. त्यात स्कूबा डायव्हींग किट किती बहुमुल्य आहे. याची प्रात्यक्षिके दाखविली. त्याला दिलेल्या किटमध्ये बीसीडी गणवेश हा पाण्यात त्याचे शरीराचे तापमान नियंत्रणात राखते. तर त्या किटमध्ये आॅक्सिजन सिलेंडर, प्रेशर गेज, पाण्यातील दिसण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चष्मा,विशिष्ट प्रकारचे बुट, आदींचा वापर कसा केला जातो हेही त्याने उपस्थितांना दाखविले.
दिनकरने आतापर्यंत सव्वा चार हजाराहून अधिक मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून ६३० हून अधिक जणांचे प्राणही वाचविले आहेत. या कार्याची दखल घेत ‘बुलडाणा अर्बन’ परिवाराने त्याला हे आॅस्ट्रेलियन बनावटीचे स्कूबा डायव्हींग किट दिले आहे. विशेष म्हणजे हे किट कसे वापरायचे व त्यातून इतरांचे प्राण व पाण्याच्या आतील जीवसृष्टीचा अभ्यास व त्याचे निरीक्षण कसे करायचे यासाठी उपयोगीआहे.
आतापर्यंत दिनकर या किटशिवाय स्वत:चा जीव धोक्यात घालून हे काम करीत होता. त्यात या किटमुळे त्याच्या या अनोख्या पण समाजउपयोगी कामात मोठा उपयोग होणार आहे. कारण अशा प्रकारचे किट प्रथमच कोल्हापूरात उपलब्ध झाले आहे.
यावेळी बुलडाणा अर्बन चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे,वि•ाागीय व्यवस्थापक अविनाश कुंभार, वरिष्ठ व्यवस्थापक गुरुनाथ लोखंडे, पुणे शाखा व्यवस्थापक योगिनी पोफळे, शैलेंद्र हावळ, बाळासाहेब पाटील, बाबुराव थोरात, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
दोन महिन्यांच्या स्कूबा डायव्हींगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मी पुर्ण केले आहे. या बीसीडी जॅकेट स्कूबा डायव्हींग किटचा वापर आपत्तीकालीन परिस्थितीत करता येणार आहे. यापुर्वी पाण्यात बुडालेले मृतदेह काढताना ५० ते १०० फुटापर्यंत विना आॅक्सिजन जात होतो. त्यात मर्यादा होत्या ठराविक अंतरापर्यंत जीव धोक्यात घालून मी ते मृतदेह बाहेर काढीत होतो. मात्र, बुलडाणा अर्बन परिवाराने माझी दखल घेत मला दोन लाख किंमतीचे परदेशी बनावटीचे हे किट दिले आहे. त्यामुळे मला १२५ ते १५० फुटापर्यंत खाली जाता येणार आहे. त्याचा पुरेपुर वापर जिल्ह्यातील पाण्यात बुडालेल्या मृतदेहांसाठी व बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी करेन.
- दिनकर कांबळे,
जीवरक्षक