कोल्हापूर : प्रवासांची लूट करणाऱ्या खासगी बसेसवर थेट कारवाई, दिवाकर रावते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:40 PM2018-05-04T15:40:56+5:302018-05-04T15:40:56+5:30
खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री रावते एका खासगी कार्यक्रमासाठी शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. शिवशाही प्रमाणेच वातानुकुलित ‘लालपरी’ बस सेवा वर्षभरात सुरू करत आहोत. प्रवाशांना रास्त दरात ही सेवा देणार असून ‘शिवशाही’ प्रमाणेच ‘लालपरी’ही लोकप्रिय होईल, असा विश्वास मंत्री रावते यांनी व्यक्त केला.
खासगी बस चालकांकडून प्रवाशांकडून जादा पैसे आकारणीच्या तक्रारी येत आहेत. याबाबत परिवहन विभागाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे काम गतीने सुरू आहे. याबाबत तक्रारी आल्या की त्याची खातरजमा करून संबधितांवर थेट परवाना रद्दची कारवाई केली जाईल.