स्थलांतरितांच्या सोयी-सुविधांसाठी कोल्हापूर डिझास्टरचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:20+5:302021-07-24T04:16:20+5:30
कोल्हापूर : पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपने पुढाकार घेतला असून शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील ...
कोल्हापूर : पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपने पुढाकार घेतला असून शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत जिल्हा व शहरामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, शहरात व जिल्ह्यात झालेल्या विस्थापितांसाठी जेवणाची सोय करण्यात यावी. तसेच गॅस सिलिंडर, पुरेसा औषधोपचार यांचा साठा ठेवण्यात यावा. या कामात कोल्हापूर डिझास्टरच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, या कामासाठी महासैनिक दरबार हॉलचा कार्यालय म्हणून वापर करण्यात यावा. पुरानंतर साफसफाईच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्रजित नागेशकर यांनी कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटला पूरस्थितीत काम करण्यासाठी स्वयंसेवक, आवश्यक ती मशनरी आणि मदतीच्या अनुषंगाने इतर साहित्य देण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी ललित संघवी, राजू लिंग्रज, डॉ. शीतल पाटील, शांताराम सुर्वे, विद्यानंद बेडेकर, रवी पाटील, अजय देसाई, दीप संघवी, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.
--
फोटो कोलडेस्कला कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट नावाने पाठवला आहे.
ओळ : कोल्हापुरातील जिल्हा परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी स्थलांतरितांच्या सोयी-सुविधांसंबंधी चर्चा केली.
----