कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँडचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:08 PM2018-06-08T17:08:15+5:302018-06-08T17:08:15+5:30
कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँड प्रमाणपत्रांचे शुक्रवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यालयात ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हे बॉँड स्वीकारले.
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँड प्रमाणपत्रांचे शुक्रवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यालयात ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हे बॉँड स्वीकारले.
दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेला ५० कोटी रुपयांच्या बॉँड विक्रीची परवानगी दिली होती. त्यानुसार बॅँकेने महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यामध्ये ‘कोजिमाशि’ पतसंस्थेचे योगदान महत्त्वाचे होते. बॉँड प्रमाणपत्रांचे वितरण अध्यक्ष मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारपासून झाले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक संस्था व व्यक्तिगत लोकांनी बॉँड खरेदी करून सहकार्य केले. बॉँडची छपाई पूर्ण झाली असून, खरेदीदारांना त्यांच्या शाखेत हे बॉँड उपलब्ध होणार आहेत.
यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, ‘कोजिमाशि’चे अध्यक्ष प्रा. हिंदुराव पाटील, उपाध्यक्ष आनंदराव काटकर, संचालक लक्ष्मण डेळेकर, सुभाष पाटील, शांताराम तौंदकर, कैलास सुतार, अरविंद किल्लेदार, संदीप पाटील, सदाशिव देसाई, संजय डवर, कृष्णात पाटील, रावसाहेब कारंडे, कृष्णात खाडे, राजेंद्र रानमाळे, शहाजी पाटील, संजय जाधव, अनिल चव्हाण, समीर घोरपडे, गंगाराम हजारे, रामचंद्र हालके, अंजली जाधव, सुलोचना कोळी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील, आदी उपस्थित होते.