कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप‘
By admin | Published: June 28, 2016 12:24 AM2016-06-28T00:24:16+5:302016-06-28T00:44:52+5:30
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी नि:श्वास सोडला आहे. गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्णात हजेरी लावली आहे. शेजारील कोकणात गेले आठ दिवस जोरदार पाऊस सुरू असताना कोल्हापुरात मात्र कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
उगवण झालेल्या खरीप पिकांची भांगलण, कोळपण ही आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्याने आता पावसाची गरज होती. सोमवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी बारापर्यंत एकसारखी रिपरिप राहिली. त्यानंतर पाऊस कमी झाला. सायंकाळी पुन्हा पावसाने सुरुवात केली.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात ५२ मिलिमीटर इतका दमदार पाऊस झाला. त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात २१, राधानगरी व चंदगड तालुक्यांत ९.६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ३४, दूधगंगा परिसरात २९, कासारी ५०, कडवी १३, पाटगाव ६२, तर कुंभी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत झाला आहे. पावसामुळे धरणांच्या पातळीत हळूहळू वाढ होत असून, नद्यांच्या पातळीतही वाढ झालेली दिसते. पंचगंगेतील पाण्याची पातळी चार फूट असून राजाराम बंधाऱ्याजवळील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने थंड व आल्हाददायक वातावरण पसरले होते. पाऊस एकदाचा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आजऱ्यात दमदार पाऊस
आजरा : आजरा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला असून, शेतीकामांनी वेग घेतला आहे.रविवार रात्रीपासून पावसास सुरुवात झाली. पहाटेच्या दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पाऊस पुन्हा पुन्हा हजेरी लावत होता. पावसाच्या या जोरदार हजेरीने शेतकरी वर्ग शेतीकामांत गुंतला आहे.
पावसाच्या हजेरीने बाजारपेठेत बी-बियाणे, विक्रेते, रोपे विक्रेते, छत्री व पावसाळी साहित्य विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. ऊस पिकासह इतर पिकांच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
चिकोत्रा खोऱ्यात पाऊस
पांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात सोमवारी सकाळपासून तुरळक पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे खोऱ्यातील ऊस पिके ५० टक्के निघाली आहेत व भात, सोयाबीन, ज्वारी या पिकांवर येथील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. एकूणच चिकोत्रा खोऱ्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. त्यातच पावसाच्या उघडझापीमुळे कोळपण व भांगलण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आज सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील पिकांना जीवदान मिळाले आहे.
किणी परिसरात पावसामुळे शेतकरी आनंदी
किणी : किणी, घुणकी, वाठार परिसरात रविवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मान्सून पूर्व पावसाने पंधरा दिवसांपूर्वी आगमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. या पावसादरम्यान शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या मात्र, मान्सून पावसाने दडी मारल्याने दहा ते पंधरा दिवस पावसाचा पत्ताच नव्हता.
शेतकरी हवालदिल झाले होते; तर पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर येऊन ठेपली होती. त्यामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
रविवारपासून बारीक पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सुरू असलेल्या संततधारेमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पिकांना जीवदान लाभणार आहे.
हातकणंगले परिसरात रिमझिम
कुंभोज : रोहिणीसह मृग नक्षत्रातही पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आर्द्राच्या नक्षत्राच्या प्रारंभीही पुरेसा पाऊस नसल्याने बळिराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विशेषत: पुरेशा पावसाअभावी उसासह पेरक्षेत्रातील भात पिकाची वाढ खुंटली आहे. उशिरा का असेना पण दोन दिवसांपासून हातकणंगले तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने रिमझीम सुरुवात केल्याने पिके तरारली आहेत. तथापि पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत ऊस पिकाच्या भरणीची कामे खोळंबली आहेत.
अद्यापही सर्रास जमिनीत पुरेशी ओल न झाल्याने पेरणीसाठी शेतकरी दचकत पावले टाकत आहे. सर्वत्र मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप‘
मान्सून सक्रिय : धरणक्षेत्रातही दमदार पाऊस, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात, बंधाऱ्याजवळ पाण्याचा विसर्ग वाढला
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी नि:श्वास सोडला आहे.
गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्णात हजेरी लावली आहे. शेजारील कोकणात गेले आठ दिवस जोरदार पाऊस सुरू असताना कोल्हापुरात मात्र कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.