कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार शेतकऱ्यांना ४०० कोटींचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:34 AM2019-12-22T00:34:23+5:302019-12-22T00:37:11+5:30
राष्टÑीयीकृत बॅँकांकडील सुमारे १५ हजार शेतक-यांना ७७ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर नियमित परतफेड करणाºया शेतक-यांना ५० हजारांपर्यंत मदत, तर सप्टेंबर २०१९ नंतरच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हजार शेतकºयांना सुमारे ४०० कोटींचा लाभ होणार असून, त्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ होणार आहेत. यामध्ये जिल्हा बॅँकेशी संलग्न ६४ हजार ७८७ शेतकºयांना ३२३ कोटींचा लाभ होणार आहे. यामध्ये पीककर्ज, मध्यम मुदतीसह सर्वच कर्जांचा समावेश आहे. नियमित परतफेड केलेल्या शेतक-यांना ५० हजारांपर्यंत मदत मिळणार असून, सप्टेंबर २०१९ नंतरच्या कर्जास हप्ते पाडण्याचे नियोजनही राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शेतक-यांचे १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असणारे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. विशेष म्हणजे पीककर्ज, मध्यम मुदतीसह इतर अनुषंगिक कर्जांचा समावेश यामध्ये राहणार आहे. जिल्हा बॅँकेकडे जून २०२० अखेर ६४ हजार ७८७ शेतकरी थकीत असून त्यांच्याकडे सुमारे ३२३ कोटींची थकबाकी आहे. या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहेच, त्याचबरोबर राष्टÑीयीकृत बॅँकांकडील सुमारे १५ हजार शेतक-यांना ७७ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
त्याचबरोबर नियमित परतफेड करणाºया शेतक-यांना ५० हजारांपर्यंत मदत, तर सप्टेंबर २०१९ नंतरच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
पाच एकरांवरील वंचित?
दोन लाखांपर्यंत पीक कर्ज उचल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी चार ते पाच एकरांपर्यंत असतात. त्यामुळे त्यावरील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. फडणवीस सरकारच्या काळात दीड लाखापर्यंतची थकबाकी माफ केली असली तरी त्यावरील कर्जासाठी ‘ओटीएस’ योजना लागू केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीचे मनापासून स्वागत करतो. यामुळे छोट्या-छोट्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांनाही मदत मिळणार असल्याने आता खºया अर्थाने शेतकरी कर्जमुक्त होईल.
- आमदार हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बॅँक)
सर्वसामान्य शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर करून आश्वासन पूर्ण करण्याच्या द्रृष्टीने महाविकास आघाडीने मोठे पाऊल टाकले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो.
- आमदार सतेज पाटील (जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस)
या कर्जमाफीमुळे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असले तरी सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द पूर्ण होताना दिसत नाही. दुष्काळामुळे थकीत असणाºया शेतकºयांना थोडा लाभ मिळेल. पण पिकासाठी घेतलेल्या कर्जाची मुदत जून २०२० पर्यंत असल्यामुळे ते कर्ज थकीतमध्ये मोडत नाही. त्यामुळे शेतकºयांच्या पदरात काही पडणार नाही . राजू शेट्टी, माजी खासदार.
शेतकºयांचा सातबारा कोरा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. शिवसेनेची पहिल्यापासून शेतकºयांच्या बाजूने भूमिका राहिली असून, आगामी काळात शेतकरी केंद्रबिंदू मानूनच हे सरकार निर्णय घेईल.
- संजय पवार
(जिल्हाप्रमुख, शिवसेना)
निवडणुकीत शेतकºयांना कर्जमुक्तीची घोषणा करणाºया नेत्यांनी फसविले आहे. थकबाकीदारांचा विचार केला; मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे परतफेड केली, त्यांचा विचार सरकार करणार का?
- अशोकराव पवार