कोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:35 PM2019-04-30T14:35:08+5:302019-04-30T14:39:32+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ३७ लाखांचा नफा झाला आहे. बॅँकेने या वर्षात तब्बल ४०.८७ कोटींच्या तरतूद करत स्वभांडवल वाढविल्याने गतवर्षीच्या तुलनेत १0 कोटीने नफ्यात घट झाल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kolhapur district bank net profit of Rs. 33 crores: self-interest also increased | कोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले

कोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले४०.८७ कोटींच्या तरतुदीमुळे गतवर्षीच्या तुलनेत नफ्यात घट

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ३७ लाखांचा नफा झाला आहे. बॅँकेने या वर्षात तब्बल ४०.८७ कोटींच्या तरतूद करत स्वभांडवल वाढविल्याने गतवर्षीच्या तुलनेत १0 कोटीने नफ्यात घट झाल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षभरात संचालक मंडळ व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काटकसरीचा कारभार केल्यानेच ७४.१८ कोटींचा ढोबळ नफा झाला. नाबार्ड व रिझर्व्ह बॅँकेच्या निकषानुसार आवश्यक त्या तरतुदी केल्या, यामध्ये प्रामुख्याने रजेचा पगार, ग्रॅज्युईटी अ‍ॅडव्हान्स, कर्मचारी बोनस, विकास संस्था सचिव बक्षीस, स्टॅण्डर्ड अ‍ॅसेट, एन. पी. ए., इन्कम टॅक्स यांसह विविध ४० कोटी ८७ लाख ४१ हजारांच्या तरतुदी केल्या. तरतुदी वजा जाता ३३ कोटी ३७ लाखांचा निव्वळ नफा झाला. यावेळी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक रणवीर चव्हाण, आदी उपस्थित होते.

सभासदांना १० टक्के लाभांश?

निव्वळ नफ्यातून रिझर्व्ह फंडासह सभासदांना लाभांशाची तरतूद करायची आहे. साधारणत: गतवर्षीपेक्षा २ टक्के जादा म्हणजेच १० टक्के लाभांश देण्याचा मानस असून, त्याची रक्कम साधारणत: १८ कोटी रुपये होते.

‘दौलत’ची वसुली चालूच्या ताळेबंदात

‘दौलत’ साखर कारखान्याची १६ कोटी ८० लाखांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर साधारणत: ११ कोटींचा हप्ताही येणार असल्याने चालूच्या ताळेबंदात तेवढ्याने नफा वाढणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

बॅँकेची तुलनात्मक प्रगती-

  1. तपशील मार्च २०१८ मार्च २०१९
  2. भागभांडवल १७६.२३ कोटी १९९.८५ कोटी
  3. आयपीडीआय बॉन्ड - ५० कोटी
  4. रिझर्व्ह व इतर फंड २७८.२७ कोटी ३१५.६२ कोटी
  5. ठेवी ४०५३.३७ कोटी ४७४०.१० कोटी
  6. गुंतवणूक १५९८.९६ कोटी १८०६.७१ कोटी
  7. कर्जे ३०११.०५ कोटी ३८५३.४६ कोटी
  8. ढोबळ नफा ५७.५६ कोटी ७४.१९ कोटी
  9. सीआरएआर १२.५५ टक्के ११.३८ टक्के
  10. निव्वळ एनपीए १.६० टक्के १.३८ टक्के

 

अशा केल्या तरतुदी-
तरतुदी                            रक्कम
रजेचा पगार                    ५ कोटी ७२ लाख ४७ हजार
गॅ्रज्युईटी अ‍ॅडव्हान्स     ६ कोटी ८० लाख ६० हजार
कर्मचारी बोनस               ६ कोटी ७५ लाख ८५ हजार
सचिव पगार बक्षीस        १ कोटी २१ लाख ८ हजार
स्टॅण्डर्ड अ‍ॅसेट                ३ कोटी
एनपीए                          ५ कोटी ५० लाख
इन्कमटॅक्स                   ११ कोटी
कॅपीटल रिझर्व्ह              ५ लाख ४१ हजार
सीबीएस फंड                  ८२ लाख
---------------------------------------------
एकूण तरतुदी              ४० कोटी ८७ लाख ४१ हजार
---------------------------------------------------
 

 

Web Title: Kolhapur district bank net profit of Rs. 33 crores: self-interest also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.