कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 12:15 PM2021-12-04T12:15:37+5:302021-12-04T12:17:00+5:30

जिल्हा बँकेत जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, यापेक्षा आघाडीसोबत राहण्याबाबत झाले एकमत. महाडिक यांच्यासोबत सोमवारी चर्चा

Kolhapur District Bank Politics P. N. Patil meeting between Prakash Awade, vinay Kore | कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत

कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत

googlenewsNext

कोेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत शुक्रवारी रात्री आमदार पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय काेरे व आमदार पाटील यांच्यात बैठक झाली. यामध्ये, जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, यापेक्षा आघाडीसोबत राहण्याबाबत एकमत झाले.

आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय काेरे यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार शुक्रवारी उभय नेत्यांत सुमारे दाेन तास बैठक झाली. आमदार आवाडे यांनी ‘पतसंस्था-बँक’ व ‘प्रक्रिया’ अशा दोन गटांतून अर्ज भरले आहेत. मागील संचालक मंडळात आवाडे समर्थक विलास गाताडे हे इतर मागासवर्गीय गटातून बँकेत आले होते. पतसंस्था किंवा प्रक्रिया यापैकी एक जागा मला सोडा, यावर आवाडे ठाम राहिले असले तरी त्यांनी आघाडीसोबत राहण्याची निश्चित केल्याचे समजते.

महाडिक यांच्यासोबत सोमवारी चर्चा

महादेवराव महाडिक यांच्या सोबत सोमवारी (दि. ६) आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय कोरे हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) जिल्हा बँकेत मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी एकत्रित बैठक होऊन आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे, तिथे राजकारणविरहित कारभार चालण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. याबाबतच आमची बैठक झाली, यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. - आमदार विनय काेरे

Web Title: Kolhapur District Bank Politics P. N. Patil meeting between Prakash Awade, vinay Kore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.