लाडक्या बहिणींना कोल्हापूर जिल्हा बँक देणार ३० हजार कर्ज; निकष काय..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:11 IST2025-04-02T13:10:37+5:302025-04-02T13:11:21+5:30
ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना : १.३८ लाख महिलांना होणार लाभ

लाडक्या बहिणींना कोल्हापूर जिल्हा बँक देणार ३० हजार कर्ज; निकष काय..जाणून घ्या
कोल्हापूर : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनाकोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने ३० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजने’मध्ये बँकेत पैसे जमा होणाऱ्या १ लाख ३८ हजार १५८ महिलांना १० टक्के व्याजदराने लाभ होणार आहे.
गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांची दैनंदिन व्यवहारासाठी सावकारी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून होणारी जादा व्याजाची आर्थिक पिळवणूक थांबविण्याच्या उद्देशाने बँकेने ही योजना आणली आहे.
कर्जयोजनेसाठी हे आहेत निकष..
- लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी व पैसे जिल्हा बँकेत जमा होणे आवश्यक
- लाडक्या बहीण योजनेतील दोन लाभार्थी जामीनदार
- मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही.
- व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कर्जदार व जामीनदार हे बँकेचे 'ब' वर्ग सभासद घेणे आवश्यक आहे.
दृष्टिक्षेपात कर्ज योजना..
- कर्जमर्यादा - ३० हजार
- परतफेडीची मुदत - तीन वर्षे
- व्याजदर - १० टक्के
- मासिक हप्ता - ९६८ रुपये
बचत गटाच्या महिलांसाठी कर्ज योजना
उद्योग-व्यवसाय क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगार संधी विचारात घेऊन ‘जीएलजी’ समूहातील महिला सदस्यांकरिता व्यक्तिगत ५० हजार रुपये कर्ज सुविधा उपलब्ध. यामध्ये ब्यूटी पार्लर व शिलाई मशिन, शेवया मशिन, छोटी गिरणी अशा प्रकारचे छोटे मशिन खरेदी करून व्यवसाय करता येणार आहे.
कष्टकरी, आर्थिक दुर्बल महिलांची सावकारी, मायक्रो फायनान्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी बँकेने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील उर्वरित भगिनींनीही या योजनेचा लाभ घ्यावा. - हसन मुश्रीफ ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक