Kolhapur Crime: गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास
By सचिन यादव | Updated: March 7, 2025 18:36 IST2025-03-07T18:34:04+5:302025-03-07T18:36:25+5:30
पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने केला होता लैंगिक अत्याचार

Kolhapur Crime: गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास
कोल्हापूर : नाती समान असलेल्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भादोले (ता. हातकणंगले) येथील दादू लक्ष्मण यादव (वय ७०) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग एक) पी. एफ. सय्यद यांनी शुक्रवारी २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले होते. २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडीत चुलत बहिणीसोबत खेळताना आरोपी दादू यादव याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना पीडीतेने बहिण आणि आईला सांगितली. त्यानंतर यादव याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावी केली होती. या प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
१३ साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणात १३ साक्षीदारांची तपासणी झाली. सहाय्यक सरकारी वकील जाधव यांनी केलेला युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून आरोपीला गुन्ह्यात दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तपासात वडगाव पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शरयू देशमुख यांचे सहकार्य लाभले.