बायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:36 PM2020-08-29T12:36:02+5:302020-08-29T12:37:39+5:30

बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Kolhapur district is first in the country in biogas production | बायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला

बायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला

Next
ठळक मुद्देबायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला३२ वर्षांचे सातत्य, यंदाही कोरोना काळातही उदिदष्टपूर्ती

कोल्हापूर : बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिवर्षी जिल्हा परिषदेला केंद्र शासनाकडून राष्ट्रीय बायोगॅस विकास व सेंद्रिय खत योजनेतअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात येते. त्या त्या वर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक सयंत्रांची उभारणी करीत जिल्हा परिषद नेहमी प्रथम क्रमांक पटकावत आली आहे. सन २०१९-२० साली १०७० सयंत्रे उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापूर आणि कोरोनाचे संकट असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. देशातील कोणत्याही जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांचे यामध्ये योगदान असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur district is first in the country in biogas production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.