दिलासादायक चित्र। एकाबाबत काळजी, एक नियंत्रणात; घराबाहेर पडून धोका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 07:09 PM2020-04-22T19:09:08+5:302020-04-22T19:17:41+5:30

कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये.

 In Kolhapur district, four out of six corona patients are in critical condition | दिलासादायक चित्र। एकाबाबत काळजी, एक नियंत्रणात; घराबाहेर पडून धोका नको

दिलासादायक चित्र। एकाबाबत काळजी, एक नियंत्रणात; घराबाहेर पडून धोका नको

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सहापैकी चार रुग्ण ठणठणीत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण सहा कोरोना संशयित रुग्ण आढळले असून, त्यांतील चौघांची प्रकृती चांगली आहे. एका रुग्णाची प्रकृती अजून धोक्याबाहेर नसली तरी नियंत्रणात आहे. एक रुग्ण वयोवृद्ध असल्याने व त्यांना अन्य आजारांची पार्श्वभूमी असल्याने त्यांचीच स्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात संशयित रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर १५ क्रमांकावर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत.

राज्यातील सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, वर्धा, धुळे, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार आणि चंद्रपूर या १० जिल्ह्यांत आतापर्यंत एकही संशयित रुग्ण सापडलेला नाही. कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये.


कोरोना रुग्ण क्रमांक 1


१रुग्णाचा इतिहास : इस्लामपूर येथील कुटुंबीय सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. ते १३ मार्चला परतले. त्यानंतर त्यांचा नातेवाइकांशी संपर्क आला. त्यामध्ये पेठवडगावच्या २२ वर्षीय युवतीचा समावेश.
२रुग्णालयात दाखल : तिच्या घशातील स्रावाची चाचणी केल्यानंतर २५ मार्च २०२० ला अहवाल पॉझिटिव्ह आला.
३सध्या कुठे उपचार : तिच्यावर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार.
४अहवाल काय सांगतो : तिच्या १४ दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने ती कोरोनामुक्त मानली जाते. सध्या तिला मिरज येथे संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.
५ सध्याची स्थिती : आता तिची प्रकृती चांगली आहे.


कोरोना रुग्ण क्रमांक 2


१रुग्णाचा इतिहास : पुणे येथील गुलटेकडी परिसरातील ३९ वर्षांची ही व्यक्ती २१ मार्च रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जनरल डब्यातून कोल्हापुरात. भक्तिपूजानगरमधील आपल्या बहिणीकडे वास्तव्य केले.
२रुग्णालयात दाखल : काही दिवसांनी त्रास सुरू झाल्याने सीपीआर कोरोना कक्षामध्ये दाखल. २५ मार्चला कोरोना झाल्याचे स्पष्ट.
३सध्या कुठे उपचार : सध्या उजळाईवाडी येथील ‘अथायु हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत आहेत.
४अहवाल काय सांगतो : त्यांचा १४ दिवसांनंतरच पहिला अहवाल निगेटिव्ह आला असून, दुसऱ्याची प्रतीक्षा आहे.
५ सध्याची स्थिती : रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यांचे सलगचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल.


कोरोना रुग्ण क्रमांक 3


१रुग्णाचा इतिहास : भक्तिपूजानगर येथील ३९ वर्षीय पुण्याहून आलेल्या कोरोनाग्रस्त तरुणाच्या कोल्हापूरस्थित बहिणीलाही २८ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट.
२रुग्णालयात दाखल : उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटलमध्ये २८ मार्चला दाखल
३सध्या कुठे उपचार : उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत.
४अहवाल काय सांगतो : त्यांचा १४ दिवसांनंतरचा घशातील स्राव घेण्यात आला असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
५सध्याची स्थिती : सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. आज, रविवारी पुन्हा स्राव घेण्यात येईल. तो निगेटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल.


कोरोना रुग्ण क्रमांक 4


१रुग्णाचा इतिहास : सातारा येथे नातेवाइकाचे निधन झाले म्हणून सांत्वनासाठी गेलेल्या कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील ६३ वर्षांच्या वृद्धेला कोरोना झाल्याचे स्पष्ट. नातेवाइकांकडे जाऊन ती २८ मार्चला कोल्हापुरात आली.
२रुग्णालयात दाखल : त्यानंतर प्रकृती बिघडल्याने खासगी व सेवा रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली. ४ एप्रिलला तिला कोरोना विशेष कक्षामध्ये दाखल केले.
३सध्या कुठे उपचार : सध्या ‘सीपीआर’मधील कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
४अहवाल काय सांगतो : त्यांचा ५ एप्रिलला अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसांनंतर त्यांच्या पुन्हा चाचण्या घेण्यात येतील.
५सध्याची स्थिती : प्रकृती स्थिर, परंतु धोका कायम; कारण रुग्णास वयोमानानुसार व अन्य आजारांचीही पार्श्वभूमी.


कोरोना रुग्ण क्रमांक 5
१रुग्णाचा इतिहास : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील महावितरणमध्ये आॅपरेटर म्हणून नोकरीस आलेला हा ३० वर्षीय तरुण नमाज पढण्यासाठी दिल्लीत मरकजला गेला होता. तेथून आल्यामुळेच त्यास पन्हाळा येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले व प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने त्याच्या घशातील स्राव घेण्यात आला.
२रुग्णालयात दाखल : अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या तरुणास ९ एप्रिलला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३सध्या कुठे उपचार : सध्या सीपीआरमध्ये कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
४अहवाल काय सांगतो : १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चाचण्या घेण्यात येतील.
५सद्य:स्थिती : प्रकृती नियंत्रणात, अन्य कोणत्याच आजाराची पार्श्वभूमी नाही; परंतु ‘सीपीआर’ची यंत्रणा लक्ष ठेवून.


कोरोना रुग्ण क्रमांक 6
१रुग्णाचा इतिहास : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईसही कोरोना झाल्याचे स्पष्ट. त्या ४९ वर्षांच्या आहेत.
२रुग्णालयात दाखल : ९ एप्रिलला पॉझिटव्ह आल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या घरातील सदस्यांसह संपर्कात आलेल्यांना ‘सीपीआर’मध्ये आणून तपासणी करून घशातील स्राव घेतले. त्याचा अहवाल ११ एप्रिलला पहाटे आला असून, त्याच्या आईला कोरोना झाल्याचे स्पष्ट.
३सध्या कुठे उपचार : पहाटे अहवाल आल्यानंतर २० मिनिटांमध्ये या महिलेला कोरोना रुग्ण कक्षातून कोरोना अतिदक्षता कक्षामध्ये हलविल्यानंतर उपचार सुरू.
४अहवाल काय सांगतो : पहिला अहवाल पॉझिटिव्ह असून १४ दिवसांनंतर पुन्हा चाचणी.
५सध्याची स्थिती : प्रकृती नियंत्रणात, अन्य कोणत्याच आजाराची पार्श्वभूमी नाही.

Web Title:  In Kolhapur district, four out of six corona patients are in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.