corona virus: हुश्श.... अखेर कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:26 PM2022-04-21T12:26:14+5:302022-04-21T12:37:31+5:30

गेले महिनाभर रोज शून्य किंवा एखादा-दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून येत होता; परंतु कोरोनाची सर्व आकडेवारी बुधवारी शून्यावर आली.

Kolhapur district is finally free from corona virus | corona virus: हुश्श.... अखेर कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त !

corona virus: हुश्श.... अखेर कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त !

Next

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही; तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बुधवारी खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून ‘कोराेनामुक्त’ झाला आहे. गेले महिनाभर रोज शून्य किंवा एखादा-दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून येत होता; परंतु कोरोनाची सर्व आकडेवारी बुधवारी शून्यावर आली.

१ जानेवारी २०२२ पासून कोरोनाची तिसरी लाट मानली जाते. या लाटेमध्ये कोरोनाची तीव्रता फारशी जाणवली नसल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे रुग्णांचे प्रमाण खूपच कमी राहिले; परंतु अनेकांचा मृत्यूही या तिसऱ्या लाटेत झाला आहे. २२ जानेवारी २०२२ रोजी सर्वाधिक म्हणजे ७६९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

यानंतर हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली; परंतु १५ मार्चपासून ती झपाट्याने कमी होत गेली. १ ते २० एप्रिलपर्यंत १५ दिवस कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही; तर त्यानंतर एखादा-दुसरा रुग्ण आढळत होता. एकदा कोरोना झाल्यानंतर दहा दिवस तो सक्रिय रुग्ण मानला जात असल्यामुळे नवीन रुग्ण आढळत नसला तरी जिल्हा कोरोनामुक्त मानला जात नव्हता; परंतु बुधवारी कोरोनामुक्तही शून्य आणि नवीन एकही रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला.

तिसऱ्या लाटेची स्थिती

  • एकूण कोरोना रुग्ण १३ हजार ३३२
  • मृत्यू ११२
  • सर्वाधिक रुग्ण २२ जानेवारी २२ रोजी... ७६९


एकूण तीनही कोरोना लाटेतील स्थिती

  • पहिला रुग्ण... २३ मार्च २०२०
  • आतापर्यंतचे कोरोनाबाधित २ लाख २० हजार ३४६
  • कोरोनामुक्त नागरिक २ लाख १४ हजार ४३५
  • एकूण मृत्यू ५,९११

Web Title: Kolhapur district is finally free from corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.