कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला, दिवसभर ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:51 PM2018-12-04T17:51:21+5:302018-12-04T17:58:14+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, बुधवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, बुधवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागली होती, हळूहळू थंडीचा कडाका वाढत असताना सोमवारपासून वातावरणात अचानक बदल होत गेला. थंडी कायम आहेच, पण ढगाळ वातावरण राहिले.
जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण होऊन ते १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी किमान १८, तर कमाल ३० डिग्री तापमान राहिले. दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी थंडीही कायम होती.