‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:55 AM2024-08-14T11:55:11+5:302024-08-14T11:55:57+5:30

शेतकऱ्यांच्या मुलांना पशुवैद्यकीय अधिकारी होण्याची संधी

Kolhapur District Milk Union Gokul has decided to set up a private veterinary and dairy technology college | ‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नालाॅजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालय हाेणार आहेत. त्याचा फायदा कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मुलांना होणार आहे. जिल्हा परिषद व ‘गोकुळ’कडे सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंभरहून अधिक जागा रिक्त आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याने दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख ७९ हजार ५५६ इतके आहे. पण, त्या पटीत पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने ‘एलएसएस’ कडून स्थानिक पातळीवर उपचार करुन घ्यावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ९५ जागा मंजूर आहेत, त्यापैकी ६०हून अधिक जागा रिक्त आहेत. गेली दहा-पंधरा वर्षे पूर्णक्षमतेने जागा भरल्या गेल्या नाहीत. जागा भरल्या तर तात्पुरते काम करुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दुसरे क्षेत्र निवडले जाते. ‘गोकुळ’मध्ये चांगला पगार असतानाही तिथे जवळपास वीस जागा रिक्त आहेत.

सध्या महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय पाच ठिकाणी तर देशात खासगी व शासकीय महाविद्यालयाची संख्या केवळ ५६ आहे. यापूर्वी महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाने परवानगी दिली जात नसल्याने ही संख्या मर्यादित राहिली. मात्र, आता शासनाने परवानगी दिल्याने ‘गोकुळ’ने प्रस्ताव तयार केला असून, सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे.

कात्यायनी येथे ६० क्षमतेचे महाविद्यालय

पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नालॉजी महाविद्यालय हे ‘गोकुळ’च्या कात्यायनी येथील जागेवर करण्याबाबत विचार सुरू आहे. दोन्ही महाविद्यालयांची ६०-६० प्रवेशक्षमता राहणार आहे.

महाराष्ट्रात येथे आहेत शासकीय महाविद्यालय

पशुवैद्यकीय : मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ (सातारा), उदगीर (लातूर)
डेअरी टेक्नालॉजी : उदगीर व पुसद


पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सगळ्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांची मुलांना संधी मिळाली पाहिजे, ते अधिकारी व्हावेत, यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. - अरुण डोंगळे , अध्यक्ष, गोकुळ

Web Title: Kolhapur District Milk Union Gokul has decided to set up a private veterinary and dairy technology college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.