कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:19 PM2018-10-29T13:19:41+5:302018-10-29T13:23:33+5:30

शिष्यवृत्ती, कला, क्रीडा, जवाहर नवोदय विद्यालय, आदी परीक्षेत प्रावीन्य मिळविलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पाल्यांवर जि. प. सोसायटीने पाठीवर थाप मारली.

Kolhapur District Repression on the back of quality from the Employee's Society | कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप

कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप१३४ विद्यार्थी, ३ पदोन्नतीधारक कर्मचारी, ३४ सेवानिवृत्तांचा सत्कार

कोल्हापूर : शिष्यवृत्ती, कला, क्रीडा, जवाहर नवोदय विद्यालय, आदी परीक्षेत प्रावीन्य मिळविलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पाल्यांवर जि. प. सोसायटीने पाठीवर थाप मारली. त्यांच्या या गौरवाला माजी शिक्षण संचालक संपत गायकवाड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्या उमेद भरल्या शब्दांची जोड मिळाली. यावेळी सेवानिवृत्त आणि पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या साईक्स एक्स्टेशनवरील कार्यालयात गुणगौरव व कर्मचारी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम झाला. १३४ विद्यार्थी, ३ पदोन्नतीधारक कर्मचारी व ३४ सेवानिवृत्तांचा सत्कार झाला. यावेळी चेअरमन आर. डी. पाटील, व्हाईस चेअरमन शांताराम माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी शिक्षण संचालक संपत गायकवाड यांनी पाल्यांना किमान बारावीपर्यंत मोबाईल वापरायला देऊच नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. चेअरमन पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सभासदांना १२.५0 टक्के लाभांश व ११ टक्केप्रमाणे कायम ठेव, १0 टक्केप्रमाणे वर्गणी ठेवीवर व्याज अदा करणारी ही एकमेव बँक आहे.

यावेळी संचालक एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे, के. आर. किरुळकर, विजय टिपुगडे, शिवाजी काळे, रामदास पाटील, दिनकर तराळ, सचिन मगर, राजीव परीट, श्रीकांत वरुटे, बजरंग कांबळे, विष्णू तळेकर, रवींद्र घस्ते, रंजना आडके, गौरी पाटील, संगीता गुजर, एन. डी. पाटील, रणजित पाटील, सुनील मिसाळ, सयाजी पाटील, एम. एम. पाटील, राजाराम वरुटे, प्रकाश देसाई, शिवाजी कोळी, भालचंद्र माने, लालासो मोहिते, प्रकाश पाटील उपस्थित होते.

 जि. प. कर्मचारी सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमात कर्मचारी पाल्यांचा सत्कार करताना राहुल कदम, रविकांत अडसूळ, संपत गायकवाड, डॉ. एस. एच. शिंदे, एम. आर. पाटील, आर. डी. पाटील, शांताराम माने.

 

Web Title: Kolhapur District Repression on the back of quality from the Employee's Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.