कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारीपदी निलिमा अडसूळ

By सचिन भोसले | Published: October 19, 2023 01:04 PM2023-10-19T13:04:43+5:302023-10-19T13:07:19+5:30

कोल्हापूर : लाच घेतल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केले ...

Kolhapur District Sports Officer Nilima Adsul | कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारीपदी निलिमा अडसूळ

कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारीपदी निलिमा अडसूळ

कोल्हापूर : लाच घेतल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केले होते. त्यांच्या रिक्त जागी निलिमा सुर्यकांत अडसूळ यांची नियुक्ती झाली. याबाबतचे आदेश बुधवारी रात्री क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाले.

अडसूळ या यापुर्वी क्रीडा व युवा सेवा संचालनालयाच्या सहाय्यक संचालक, पुणे येथील कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांची प्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी या ठिकाणी बदली करण्यात आली होती. सुधारीत आदेशामध्ये अंशत: बदल करून त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत. याबाबतचे आदेश शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड यांनी बुधवारी रात्री काढले.

Web Title: Kolhapur District Sports Officer Nilima Adsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.