स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 07:59 PM2017-09-26T19:59:37+5:302017-09-26T20:01:43+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Kolhapur district under Swachh Bharat Mission is the first in the country | स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देदोन आॅक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरवतीन घटकांवर मुल्यांकनस्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के गुण

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


दोन आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त्याने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.


स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के इतके गुण मिळाले आहेत. दि. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा २ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.


कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कमर्चारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमर्चा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कायर्कारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन घटकांवर मुल्यांकन

केंद्र शासनाकडून या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पर्धेसाठी त्या जिल्ह्याची कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.


जिल्ह्याला मिळालेले गुण

कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.
 

 

Web Title: Kolhapur district under Swachh Bharat Mission is the first in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.