कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार

By admin | Published: July 3, 2017 03:48 PM2017-07-03T15:48:01+5:302017-07-03T15:48:01+5:30

सात धरणात ५० टक्केपेक्षा अधिक पाणी : गत वर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

Kolhapur district will be able to fill the dam early this year | कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला सुरू असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सात धरणे ५० टक्केपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. घटप्रभा, कोदे हे लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल झाले असून राधानगरी ४३ टक्के, तुळशी ५२ टक्के , वारणा ४० तर दूधगंगा ३२ टक्के पाणी साठा सध्या असल्याने यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता अधिक आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाणीसाठा जास्त आहे. गत वर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वच धरणे फुल्ल झाली होती. त्यामुळे मे पर्यंत धरणात १५ ते २५ टक्के पाणी साठा शिल्लकच होता. ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेले असले तरी वळीव पाऊस व त्यानंतरचे ‘आर्द्रा’ नक्षत्रात झालेला जोरदार पाऊस यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

जून मध्येच कोदे व घटप्रभा धरणे पहिल्यांदाच भरली आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ६६, कडवी परिसरात ७०, कुंभी धरणक्षेत्रात ५२, पाटगाव परिसरात ५७ मिली मीटर पाऊस झाल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

गेले वर्षी ३ जूलै रोजी राधानगरी धरणात ६४.९६ दशलक्ष घनमीटर होता यंदा तब्बल १०२.१९ आहे. ‘तुळशी’ धरणात गत वर्षी पेक्षा दुप्पट तर ‘दूधगंगा’ धरणात तिप्पट पाणी साठा आहे. इतर धरणातही हीच अवस्था आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता आगामी नक्षत्र काळातही दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा धरणे लवकर भरणार हे निश्चित आहे.

गतवर्षीच्या तुलनेत धरणसाठा दशलक्ष घनमीटर मध्ये 

धरण ३ जूलै २०१६ ३ जूलै २०१७ राधानगरी ६४.९६ १०२.१९ तुळशी २५.५५ ५०.७४ वारणा २६३.३८ ३९४.३६ दूधगंगा ७४.३५ २३३.६९ कासारी १८.७६ ४५.४३ कडवी ३५.०८ ३२.३२ कुंभी ३४.७० ४१.९० पाटगाव २८.८४ ४९.४८ चिकोत्रा ४.४१ ५.५० चित्री ७.८७ ११.८८

तेरा बंधारे पाण्याखाली

पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. पंचगंगेची पातळी २४ फुटापर्यंत खाली आली असून ‘पंचगंगा’, ‘भोगावती’, ‘कासारी’ नदीवरील तेरा बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.  

सोळा घरांची पडझड

पाऊस सुरू झाल्यापासून सोळा घरांची अंशता पडझड झाली आहे. त्यामध्ये ६ लाख १२ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Kolhapur district will be able to fill the dam early this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.