दहावी परिक्षेत कोल्हापूर विभाग सलग पाचव्यांदा राज्यात दुसरा
By admin | Published: June 13, 2017 03:42 PM2017-06-13T15:42:26+5:302017-06-13T15:43:22+5:30
९३. ५९ टक्के निकाल : विभागात कोल्हापूर जिल्ह्याची हॅटट्रिक
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) निकालात सलग पाचव्यांदा कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.५९ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात 0.३0 टक्क्यांनी घट झाली.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा ९४.९१ टक्क्यांसह सलग तिसऱ्यांदा अव्वल ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी विभागातील निकालाची माहिती दिली.
गोंधळी म्हणाले, कोल्हापूर विभागातंर्गत एकूण .१ लाख ४५ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हांतील ३५१ केंद्रांवरून १ लाख ४५ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३५ हजार ८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ७५ हजार ४२३ मुले तर, ६0 हजार ४0४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीणर्तेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.५१ टक्क्यांनी अधिक आहे.
कोल्हापूर विभागाचा एकत्रित निकाल ९३.५९ टक्के इतका लागला आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा ९४.९१ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सातारा जिल्हा ९३ टक्क्यांसह द्वितीय तर, सांगली जिल्हा ९२.४१ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. यावर्षी परीक्षेदरम्यान विभागामध्ये ३३ गैरमार्गांची प्रकरणे झाली. त्या सर्वांवर जणांवर कारवाई झाली. किमान आठ ते दहा दिवसांनी परीक्षार्थ्यांना शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे असे गोंधळी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे, सहाय्यक सचिव बी. एस. शेटे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी टी. एल. मोळे उपस्थित होते.
गैरप्रकारांमध्ये घट
गोंधळी म्हणाले, गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात गैरमार्ग प्रकरणे २0 झाली होती. ती यंदा १३ झाली आहेत. सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षी ५ तर यंदा ४ प्रकरणे झाली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी ३२ प्रकरणे झाली. तर यंदा हे प्रमाण ५0 टक्क्यांवर आणण्यात आम्हांला यश आले आहे. यंदा ही प्रकरणे १६ झाली आहेत. यातील ३२ विद्यार्थ्यांना मार्च मार्च २0१७ ची परीक्षेची संपूर्ण संपादणूक रद्द आणि पुढील एक परीक्षेस प्रतिबंध तर एका विद्यार्थ्यास जुलै २0१९ पर्यंत परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे शक्य झाले आहे.
जिल्हानिहाय निकाल असा...
जिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी सातारा ४१ हजार २९५ ९३.00 कोल्हापूर ५४ हजार ८७९ ९४.९१ सांगली ३९ हजार ६५३ ९२.४१ मुलींची आघाडी... या परीक्षेसाठी विभागातून एकूण ८१ हजार ९३0 मुले आणि ६३ हजार २0६ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. मुलांच्या उत्तीणर्तेची संख्या ७५ हजार ४२३ असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.0६ टक्के २ आहे. मुलींच्या उत्तीणर्तेची संख्या ६0 हजार ४0४ असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५७ टक्के आहे. मुलींच्या उत्तीणर्तेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.५१ टक्क्यांनी अधिक आहे.
विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत : १४/६/२0१७ ते २३/६/२0१७
उत्तरपत्रिका छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत : १४/६/२0१७ ते ३/७/२0१७
कोल्हापूर विभागाचा निकालात 00.३0 टक्क्यांची घट
मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीणर्तेचे प्रमाण ३.५१ टक्क्यांनी अधिक
गैरप्रकारांबाबत ३३ जणांवर कारवाई
0 टक्के निकालाची १ शाळा, तर ६५१ शाळांचा निकाल १00 टक्के
पुन:प्रविष्ठ विद्यार्थ्यांचा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा निकाल ४0.0८ टक्के लागला आहे. यामध्ये सातारा (४२.१२ टक्के), सांगली (३२.५१),कोल्हापूर (४४.५५ टक्के)या निकालाचा समावेश आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील २२२१ माध्यमिक शाळांमधील एका शाळेचा निकाल 0 टक्के लागला आहे. या शाळेतील परिक्षेला बसलेला एकही विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होवू शकला नाही. तर ६५१ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. टक्केवारी प्रमाणशाळांची संख्या 0 टक्के 0१ ३0 ते ४0 टक्के0४ ४0 ते ५0 टक्के१३ ५0 ते ६0 टक्के१३ ६0 ते ७0 टक्के३५ ७0 ते ८0 टक्के९४ ८0 ते ९0 टक्के३३१ ९0 ते ९९.९९ टक्के१0७८ १00 टक्के६५१