कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी एच. एन. कठरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:20+5:302021-07-15T04:18:20+5:30

कोल्हापूर विभागीय सहसंचालकपदी सध्या कार्यरत असणाऱ्या डॉ. अशोक उबाळे यांची अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेत मूळ ठिकाणी बदली ...

Kolhapur Divisional Higher Education Joint Director H. N. Hardwood | कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी एच. एन. कठरे

कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी एच. एन. कठरे

googlenewsNext

कोल्हापूर विभागीय सहसंचालकपदी सध्या कार्यरत असणाऱ्या डॉ. अशोक उबाळे यांची अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेत मूळ ठिकाणी बदली झाली आहे. प्रा. कठरे यांचे मूळ गाव पाचवड (ता. खटाव, जि. सातारा) असून गेल्या १५ वर्षांपासून ते राजाराम महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी नागपूरमध्ये काम केले आहे. प्रा. रोडे या मूळच्या अमरावती येथील आहेत. शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेमधून सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली. सन २०१६ मध्ये राजाराम महाविद्यालयात त्या रूजू झाल्या. दरम्यान, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदावरील नियुक्तीसाठी मुंबईतील सिडनेहॅॅम कॉलेजमध्ये उच्च शिक्षण विभागाकडून पात्र २५ उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया जूनच्या अखेरच्या आठवड्यात पूर्ण झाली. त्यामध्ये डॉ. उबाळे, प्रा. कठरे, प्रा. रोडे यांचा समावेश होता. कोल्हापूरसह अन्य नऊ सहसंचालकांच्या नियुक्तीचा आदेश उच्च शिक्षण विभागाने बुधवारी काढला. दोन वर्ष अथवा एमपीएससीकडून उमेदवार प्राप्त होईपर्यंत या नियुक्तीचा कालावधी असणार आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाल्याचा आनंद आहे. शासन नियमानुसार या पदावर कार्यरत राहणार आहे.

-प्रा. डॉ. एच. एन. कठरे.

फोटो (१४०७२०२१-कोल-एच एन कठरे (सहसंचालक), १४०७२०२१-कोल-सोनाली रोडे (सहसंचालक)

Web Title: Kolhapur Divisional Higher Education Joint Director H. N. Hardwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.