कोल्हापूर : निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही: धनंजय महाडिक : कोतवाल आंदोलनाला पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:40 PM2018-12-25T16:40:41+5:302018-12-25T16:42:58+5:30
निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला.
कोल्हापूर : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी मुंबईत होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूअसलेले कोतवालांचे धरणे आंदोलन मंगळवारी २०व्या दिवशीही सुरूराहिले.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रशांत शेटे यांच्यासह कोतवाल राजेंद्र पुजारी, संदीप टिपुगडे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते.
खा. महाडिक म्हणाले, कोतवालांचा चतुर्श्र श्रेणीत समावेश समावेश करण्यासाठी गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यांच्या मगण्या सरकार लवकरच मंजूर करेल व हे आंदोलन संपेल असे आपल्याला वाटत होते.
आंदोलनादरम्यान आपण दिल्लीत होतो. काल आपण दिल्लीहून काल कोल्हापूरात परतल्यानंतरही हे आंदोलन सुरु असल्याचे समजले. त्यामुळे मंगळवारी आपण आंदोलनस्थळी येऊन त्यांना पाठींबा दिला आहे.
जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोेतवालांनी जागेवरुन उठू नये. कारण आता निवडणूका जवळ आल्या आहेत. सरकारलाही तुमची गरज आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबवू नका. तसेच आज, बुधवारी कॅबिनेटची बैठक असून यावेळी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करु याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करणार आहे.
‘आप’कडून जेवण
गेल्या वीस दिवसांपासून आंदोलनाच्या ठिकाणी कोतवाल स्वत: जेवण करुन खात आहेत. परंतु मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन कोतवालांना जेवण दिले. तसेच या आंदोलनाला पाठींबाही व्यक्त केला.
आंदोलनस्थळी भजन
आंदोलनस्थळी राधानगरीच्या कोतवालांनी मंगळवारी संकष्टीनिमित्त व सरकारला जाग येण्यासाठी टाळ मृदंगाच्या गजरात भजन सुरु केले. यामध्ये सर्व कोतवालही सहभागी झाले.