कोल्हापूर : मानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेस, अंगणवाडी सेविकाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:22 AM2018-11-16T11:22:24+5:302018-11-16T11:28:57+5:30

शासन फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणते. व्याधी जडलेल्या असताना, कुठला डॉक्टर फिट असल्याचा दाखला देणार, अशा प्रश्नांच्या जंजाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वयोमर्यादा वाढीचा निर्णय अडकला आहे.

Kolhapur: Does not fill stomach out of honor, then how to keep fitness, Anganwadi worker's pain | कोल्हापूर : मानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेस, अंगणवाडी सेविकाची व्यथा

कोल्हापूर : मानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेस, अंगणवाडी सेविकाची व्यथा

googlenewsNext
ठळक मुद्देमानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेसअंगणवाडी सेविका, मदतनीसांची व्यथा

नसीम सनदी 

कोल्हापूर : महिन्याला चार ते सात हजारांच्या मानधनात पोट भरायचे म्हटले, तरी नाकीनऊ येतात, ४0 वर्षे धावाधाव करून साठीपर्यंत कोण धड राहत नाहीत, अनेक दुखणी मागे लागतात, ही वस्तुस्थिती असताना शासन मात्र मुदतवाढ हवी, तर फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणते. व्याधी जडलेल्या असताना, कुठला डॉक्टर फिट असल्याचा दाखला देणार, अशा प्रश्नांच्या जंजाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वयोमर्यादा वाढीचा निर्णय अडकला आहे. वयोमर्यादा वाढीचा लाभ द्यायचाच, तर सरळ द्या, त्याला नियम, अटी कशाला हव्यात? असा सूर या कर्मचाऱ्यांतून उमटत आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनिसांची वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे कायम ठेवण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने जाहीर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वयोमर्यादा ६५ वरून ६0 करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला होता; पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

आता पूर्वीप्रमाणेच ६५ वयोमर्यादा झाल्याने सेवानिवृत्ती पाच वर्षांनी वाढल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे, तर काहींच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. आनंदापेक्षा नाराज असणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. याचे कारण शासनाने घातलेली मेडिकल सर्टिफिकेटची अट हे आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनिस म्हणून काम करणाऱ्या महिला या विधवा, परित्यक्ता, गोरगरीब, दारिद्ररेषेखालील कुटुंबातील असतात. त्यांना मिळणाऱ्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. मग त्यातून स्वत:चे आरोग्य चांगले राहण्याकडे त्या कधी लक्ष देणार.

सेविका व मदतनीस म्हणून काम करताना शाळाबाह्य अनेक कामे करावी लागतात. वारंवार बैठका, प्रशिक्षणे यामुळे दगदग होते. इतर स्त्रियांप्रमाणे साठीनंतर अनेक व्याधीही जडतात. ६0 वर्षांपर्यंत काम करतानाच दमायला होत आहे, आणखी वाढ झाल्याने पैसे मिळणार असले, तरी शरीर साथ देत नाही; त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्याची बऱ्याच जणींची मानसिकता आहे. निवृत्तीनंतर ७५ हजार ते १ लाख रुपये एकरकमी घेऊन औषधोपचारासह कुटुंबासाठी खर्च करावा, अशी यामागे भावना आहे.

दोनवेळा द्यावे लागणार सर्टिफिकेट

शासन निर्णयानुसार ६५ वर्षांपर्यंतच्या मुदतवाढीचा लाभ घ्यायचा असल्यास, ६३ व्या आणि ६५ व्या वर्षी असे दोनवेळा आपण फिट असल्याचे सिव्हील सर्जनचे मेडिकल सर्टिफिकेट देणे बंधनकारक आहे.


शासनाने मुद्दाम मेख मारली

दतवाढीचा लाभ मिळू नये, मेडिकल सर्टिफिकेटच्या रूपाने शासनाने मुद्दाम मेख मारून ठेवली आहे. साठीनंतर दात पडणे, हाडे ठिसूळ होणे, रक्तदाबासह अनेक व्याधी जडतात. मग यात फिट नाही म्हणून मुदतवाढीचा निर्णय द्यायचा नाही हे सरकारचे धोरण चुकीचे आहे.
कॉ. आप्पा पाटील,
अंगणवाडी युनियन


मुदतवाढीबरोबरच सुविधाही वाढवाव्यात 

वयोमर्यादेतील वाढ ही आमच्यासारख्यांना फायदेशीर असली, तरी या उतार वयातील व्याधी व त्यावरील खर्च पाहता शासनाने मानधनासह अन्य सुविधाही वाढवून द्यायला हव्यात, असे केले तरच वयोवृद्ध सेविका, मदतनिसांची सेवा चांगल्याप्रकारे मिळणार आहे.

सुलोचना मंडपे,
अंगणवाडी सेविका

एकूण अंगणवाडी ३९९४

  1. सेविका ३६७६
  2. मदतनीस ३६७३
  3. मिनी सेविका २७0

 

मिळणारे दरमहा मानधन

  1. सेविका : ७0३0
  2. मदतनीस : ३५00

 

 

Web Title: Kolhapur: Does not fill stomach out of honor, then how to keep fitness, Anganwadi worker's pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.