कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:58+5:302021-01-19T04:26:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. ...

Kolhapur is dominated by local fronts | कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला

कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. एकूण ४३३ पैकी २७ निवडणुका बिनविरोध झाल्या. ३८६ पैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांना गुलाल मिळाला. तब्ब्ल १२५ ठिकाणी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत सत्तांतर घडवले. कागल तालुक्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. भाजपने ३० ग्रामपंचायतींवर कब्जा करत जिल्ह्याच्या राजकारणात अस्तित्व कायम राखले.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८३.६० टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी आठपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमाेजणी करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. जसे निकाल बाहेर येऊ लागले तसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

मतदान झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला, तर १५५ ठिकाणी पक्षीय झेंड्याखाली ग्रामपंचायतींची सत्ता आल्या. यंदा सत्तांतराचा आकडाही वाढला असून १२५ ठिकाणी प्रस्तापितांना लोकांना झिडकारले आहे.

हसन मुश्रीफच कागलचे श्रावणबाळ

कागल तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये विजयी संपादन करून आपण अजूनही कागल तालुक्याचे श्रावणबाळ असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिले.

सहा ठिकाणी सत्तेचे त्रांगडे

शिरोळ तालुक्यात तीन, करवीरमध्ये दोन तर आजरा तालुक्यात एका ठिकाणी मतदारांनी कोणालाच सत्ता न दिल्याने त्रिशंकू अवस्था झाली आहे. अपक्षांमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मतमोजणी केंद्रावरही ‘लिंबू-भंडारा’

ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची इर्षा पाहावयास मिळाली. मतदानाच्या दिवसापर्यंत भानामतीचे प्रकार सुरू राहिल्याने सत्ता संघर्ष उफाळून आला होता. यातूनच ‘लिंबू-भंडारा’ थेट मतमोजणी केंद्रापर्यंतही पोहोचले होते.

अनेक वर्षांच्या सत्ता उलथून लावल्या

एका एका ग्रामपंचायतीवर २०-२५ वर्षे एकहाती सत्ता राखणाऱ्यांना यंदा मतदारांनी झिडकारले आहे. करवीर तालुक्यातील आमशी, खुपिरे तर राधानगरी तालुक्यतील तळाशी ग्रामपंचायतीमधील अनेक वर्षांची सत्ता मतदारांनी उलथून लावली आहे.

बालिंगेत दिग्गजांचा धक्कादायक पराभव

शहरालगतची ग्रामपंचायत असल्याने बालिंगेची निवडणूक ‘लाख’ मोलाची झाली. येथे माजी सरपंच अनिल पोवार व श्रीकांत भवड या दिग्गजांना मतदारांनी नाकारले. ‘मनसे’चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांच्या आघाडीचाही दारूण पराभव झाला.

फोटो ओळी : सोमवारी करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये झाली. मोजणी केंद्रात एका कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी लिंबू-भंडारा जप्त केला. (फाेटो-१८०१२०२१-कोल-करवीर)

Web Title: Kolhapur is dominated by local fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.