कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांना सा. रे. पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:00 PM2018-03-10T15:00:34+5:302018-03-10T15:00:34+5:30
यंदाचा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार बिहार त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे.
शिरोळ : यंदाचा डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार बिहार त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे.
शिरोळ येथे १ एप्रिलला माजी राष्ट्रपती प्रतिभाताईं पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. स्वर्गीय डॉ. सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जात आहे.
पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून जेष्ठ पुरोगामी नेते एन.डी.पाटील, जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख, बी.जे.खताळ-पाटील यांना आतापर्यंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांना जाहीर झाला आहे. रोख १ लाख १ हजार ११ रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार व माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित राहणार आहेत.
डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (लोकप्रिय नाव : डी.वाय. पाटील; जन्म: २२ ऑक्टोबर १९३५) हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी.वाय. पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले.