कोल्हापूर : औषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:57 PM2018-09-27T16:57:35+5:302018-09-27T17:00:16+5:30

औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी आज, शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अ‍ॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली आहे.

Kolhapur: Drug shopkeepers closed the countrywide one-day on Friday | कोल्हापूर : औषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंद

कोल्हापूर : औषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंद

Next
ठळक मुद्देऔषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंदमध्यरात्रीपासून बंद; कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचा सहभाग

कोल्हापूर : औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अ‍ॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली आहे.

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेली कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टसनी एक दिवसाचा ‘बंद’ पुकारलेला आहे.

‘एआयओसीडी’ने निदर्शनास आणलेल्या अनेक गंभीर मुद्द्यांमधील या समस्येमुळे संस्थेतील सदस्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान होणार आहे. औषधांची आॅनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतात. याबाबत जागरूकता आणण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टस्नी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्री बारापासून शुक्रवारी रात्री बारापर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक औषधे उपलब्ध

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनतर्फे ‘बंद’ काळात रुग्णांना अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी असोसिएशनच्या केमिस्ट भवन, केव्हीज प्लाझा, स्टेशन रोड येथे संपर्क साधावा; तसेच अधिक माहितीसाठी ०२३१-२६५६६०९ येथे संपर्क साधावा. अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे सचिव शिवाजी ढेंगे यांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: Drug shopkeepers closed the countrywide one-day on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.