कोल्हापूर : उत्तम दिघे झाले वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 04:57 PM2018-06-09T16:57:15+5:302018-06-09T16:57:15+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), विशेष कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र उगले यांची सोलापुरचे जिल्हा पुरवठा अधिकारी तर पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चौबे यांची उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून नेमणूक झाली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), विशेष कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र उगले यांची सोलापुरचे जिल्हा पुरवठा अधिकारी तर पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चौबे यांची उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून नेमणूक झाली.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी (भू संपादन क्रं.६)पदी सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भू संपादन क्रं.१) शंकर भोसले यांची नेमणूक झाली. ११ मे रोजी राज्यातील ४८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तहसिलदार उत्तम दिघे, रामचंद्र चौबे, रामचंद्र उगले यांचा समावेश होता. पदोन्नती मिळाली तरही त्यांना पदोन्नतीचे ठिकाण निश्चित झाले नव्हते.
शनिवारी सहसचीव एम. ए. गुट्टे यांनी राज्यपालांच्या आदेशाने मंत्रालयातून पदस्थापनेबाबत आदेश काढले. त्यानुसार उत्तम दिघे यांची नागपूर विभागातील वर्धा येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), रामचंद्र उगले यांची सोलापुरयेथे पुरवठा अधिकारी तर रामचंद्र चौबे यांची उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून नेमणूक झाली
त्याचबरोबर अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी (भू संपादन क्रं.६)पदी सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भू संपादन क्रं.१) शंकर भोसले यांची नेमणूक झाली. याबाबतचे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले.