कोल्हापूर : भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’, पहिल्यांदाच भरघोस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:47 PM2018-06-04T13:47:24+5:302018-06-04T13:47:24+5:30

दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolhapur: Due to the increase in the allowance ST Employee 'suasat' | कोल्हापूर : भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’, पहिल्यांदाच भरघोस वाढ

कोल्हापूर : भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’, पहिल्यांदाच भरघोस वाढ

Next
ठळक मुद्देभत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’अठरा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ वर्षाला २५० कोटींचा खर्च

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अठरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तेवाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे सन्मान केला. या निर्णयाने महामंडळावर भत्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी४५ कोटींवरून २५० कोटी इतका बोजा वाढणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा देणारी गाडी म्हणजे एस.टी. बस. प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचविण्याची सेवा एस.टी.चे चालक-वाहक व अन्य विभागांतील कर्मचारी अखंडपणे करतात.

घरातील सण, यात्रा बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना मात्र पगारासह मिळणारा भत्ता अल्प प्रमाणात असल्याने, महागाईच्या काळात या कामगारांची मानसिक व आर्थिक कुचंबणा होत होती.

मात्र एस. टी. महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली. या पगारवाढीसोबत विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

‘भत्तेवाढ’ अशी...

कामगारांना हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये इतका करण्यात आला आहे.

पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता फक्त चार रुपये आहे. तो आता ७५ रुपये इतका करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता हा ११ रुपयांवरून ८० रुपये, तर विनिर्दिष्ट (मेट्रो सिटी) ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात आला आहे.


मंडळाच्या अध्यक्षांनी वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये भरघोस वाढ केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. संघटनेचे प्रमुख भाई जगताप यांनी या ऐतिहासिक वाढीमध्ये प्रमुख मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.
- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना

कामगारांना अतिरिक्त कामांचा परिपूर्ण मोबदला मिळला पाहिजे. ही भत्तेवाढ यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र ‘देर आये, दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे या भत्तेवाढीचे आम्ही स्वागत करतो. आजच्या महागाईच्या काळातील ही भत्तेवाढ अल्प आहे.
- आप्पासाहेब साळोखे,
विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

पूर्वीच्या भत्त्यांमध्ये चहाचे पैसे भागविणेही शक्य नव्हते. मात्र महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या नव्या भत्तेवाढीमुळे एकवेळचे जेवण तरी मिळणार आहे. त्यामुळे हिला ‘ऐतिहासिक भत्तेवाढ’ म्हणता येईल.
- दीपक घाटगे,
जिल्हाध्यक्ष, एस. टी. कामगार सेना

 

 


भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’

अठरा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ : वर्षाला २५० कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रदीप शिंदे / कोल्हापूर : दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाºयांना मिळणाºया भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अठरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तेवाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एक प्रकारे सन्मान केला. या निर्णयाने महामंडळावर भत्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी४५ कोटींवरून २५० कोटी इतका बोजा वाढणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा देणारी गाडी म्हणजे एस.टी. बस. प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचविण्याची सेवा एस.टी.चे चालक-वाहक व अन्य विभागांतील कर्मचारी अखंडपणे करतात. घरातील सण, यात्रा बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करणाºया एस.टी. कर्मचाºयांना मात्र पगारासह मिळणारा भत्ता अल्प प्रमाणात असल्याने, महागाईच्या काळात या कामगारांची मानसिक व आर्थिक कुचंबणा होत होती. मात्र एस. टी. महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली. या पगारवाढीसोबत विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केल्याने, कर्मचाºयांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
------------------------
‘भत्तेवाढ’ अशी...
कामगारांना हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये इतका करण्यात आला आहे. पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता फक्त चार रुपये आहे. तो आता ७५ रुपये इतका करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता हा ११ रुपयांवरून ८० रुपये, तर विनिर्दिष्ट (मेट्रो सिटी) ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात आला आहे.
---- --------------------
मंडळाच्या अध्यक्षांनी वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये भरघोस वाढ केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. संघटनेचे प्रमुख भाई जगताप यांनी या ऐतिहासिक वाढीमध्ये प्रमुख मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.
- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना
------------------------------
कामगारांना अतिरिक्त कामांचा परिपूर्ण मोबदला मिळला पाहिजे. ही भत्तेवाढ यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र ‘देर आये, दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे या भत्तेवाढीचे आम्ही स्वागत करतो. आजच्या महागाईच्या काळातील ही भत्तेवाढ अल्प आहे.
- आप्पासाहेब साळोखे,
विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)
------------------------------------------
पूर्वीच्या भत्त्यांमध्ये चहाचे पैसे भागविणेही शक्य नव्हते. मात्र महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या नव्या भत्तेवाढीमुळे एकवेळचे जेवण तरी मिळणार आहे. त्यामुळे हिला ‘ऐतिहासिक भत्तेवाढ’ म्हणता येईल.
- दीपक घाटगे,
जिल्हाध्यक्ष, एस. टी. कामगार सेना
-------------------
एस.टी.चे संग्रहित छायचित्र

 

Web Title: Kolhapur: Due to the increase in the allowance ST Employee 'suasat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.