कोल्हापूर : एलकुंचवारांच्या पुस्तकाचे अभिवाचन, श्रोत्यांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:33 PM2018-09-10T17:33:29+5:302018-09-10T17:36:15+5:30
मराठीतील ख्यातनाम लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'त्रिबंध' या ललित पुस्तकातील 'लुकलुकती दूर दिवे गावामधले' या निबंधाचे अभिवाचन कोल्हापूरातील नाट्यलेखक हिमांशू स्मार्त यांनी सादर केले. या अभिनव उपक्रमाला वाचक श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोल्हापूर : मराठीतील ख्यातनाम लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'त्रिबंध' या ललित पुस्तकातील 'लुकलुकती दूर दिवे गावामधले' या निबंधाचे अभिवाचन कोल्हापूरातील नाट्यलेखक हिमांशू स्मार्त यांनी सादर केले. या अभिनव उपक्रमाला वाचक श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये 'सर्जनशाळा' मार्फत दर महिन्याला 'विभाव, तऱ्हा पुस्तकांच्या' हा अभिवाचनाचा मासिक उपक्रम कोल्हापूरात सुरु करण्यात आला आहे.
मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तकं लोकांपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भावलेली, मना-बुद्धीला भिडलेली, अनवट; वाचकांपर्र्यत न पोहचलेल्या काही पुस्तकांच्या अभिवाचनांचे प्रयोग कोल्हापूरातील रंगकर्मी सादर करत आहेत.
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये 'सर्जनशाळा'मार्फत विभावचा विनामूल्य सादर झालेला हा दुसरा प्रयोग होता. गेल्या महिन्यात चंद्रकांत राजाची कन्या या पुस्तकातील काही कथांचा या अभिवाचनात समावेश होता. या उपक्रमासाठी रोहित पाटील, सत्पाल गंगलमाले, तानाजी साबळे, चैतन्य कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.