कोल्हापूर : ‘अण्णासाहेब पाटील’ महामंडळाची यंत्रणा सक्षम करणार : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:49 PM2018-09-03T17:49:00+5:302018-09-03T17:51:24+5:30

मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची यंत्रणा सक्षम केली जाईल, असे या महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी येथे सांगितले.

Kolhapur: Enabling the system of 'Annasaheb Patil' corporation: Sanjay Pawar | कोल्हापूर : ‘अण्णासाहेब पाटील’ महामंडळाची यंत्रणा सक्षम करणार : संजय पवार

कोल्हापुरात सोमवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डावीकडून दत्ता टिपुगडे, विराज पाटील, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, रवि चौगुले, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अण्णासाहेब पाटील’ महामंडळाची यंत्रणा सक्षम करणार : संजय पवार ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट

कोल्हापूर : मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची यंत्रणा सक्षम केली जाईल, असे या महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी येथे सांगितले.

नूतन उपाध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी उपाध्यक्ष पवार यांचे स्वागत केले.

यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील, शिवसेनेचे सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, दत्ता टिपुगडे, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, रवि चौगुले, विराज पाटील उपस्थित होते.

उपाध्यक्ष पवार म्हणाले, गेल्या २८ वर्षांतील माझ्या कार्याला पक्षाने या महामंडळावरील निवडीच्या माध्यमातून न्याय दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन.

या महामंडळाचे कोल्हापुरात उपकेंद्र, तर अन्य महसुली विभागात कार्यालये सुरू करणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवक-युवती, महिला, उद्योजक, आदी घटकांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

सेना पदाधिकाऱ्यांचा बुधवारी मुंबईत मेळावा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या, बुधवारी मुंबईमध्ये होणार आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे दि.४ ते ६ आॅक्टोबर दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या दौºयावर येणार आहेत, असे उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title: Kolhapur: Enabling the system of 'Annasaheb Patil' corporation: Sanjay Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.