कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:27 PM2018-12-07T16:27:34+5:302018-12-07T16:29:49+5:30
कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
कोल्हापूर : कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
जिल्ह्यातील ‘स्मॅक’, ‘गोशिमा’, ‘मॅक’, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनसह सर्व औद्योगिक संघटनांनी महावितरणने सध्या केलेली वीज दरवाढी मागे घ्यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय गुरूवारी (दि. ६) सामूहिकपणे घेतला. त्याचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारपासून उद्योजक आणि त्यांच्या कंपनीमधील कामगारांनी काळ्या फिती लावून काम सुरू केले.
यावेळी इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इचलकरंजी आणि हातकणंगले औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले.