कोल्हापूर :  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:11 AM2018-11-15T11:11:58+5:302018-11-15T11:13:19+5:30

रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले.

Kolhapur: Establishment of Welfare Board for rickshaw pullers; Request 'RTO' | कोल्हापूर :  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदन

 आॅटो रिक्षाचालक संंघटना संयुक्त कृती समितीतर्फे रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन दिले. यावेळी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदनआॅटो रिक्षाचालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची मागणी

कोल्हापूर : रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले.

यात रिक्षा व्यावसायिकांचा विमा रद्द करावा. नवीन रिक्षांच्या परमिटना स्थगिती मिळावी. ज्यांना इरादापत्रे दिली आहेत, तेवढाच कोटा पूर्ण करून, ते बंद करावे. गॅसकीट टाकी पासिंग पुन्हा सुरू करावे. विना परमिट रिक्षा फिरविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी. बॅजसाठी पैसे भरून घेतलेल्यांना त्वरित बॅज मिळावेत.

पूर्वीप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा, या तीन जिल्ह्यांसाठी परवाना मिळावा. रोड टॅक्स भरूनही कोल्हापुरातील रस्ते सुस्थितीत नाहीत. यात वाहनांचे नुकसान होत आहे; त्यामुळे हा कर रद्द करावा. रिक्षाचालकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी विविध रिक्षाचालक संघटनांचे अध्यक्ष महादेव विभुते, राजेंद्र थोरावडे, सुभाष सूर्वे, गजानन विभुते, भगवान रावळ, अशोक कातवडे, विनायक माजगावकर, रवि थोरावडे, मनोज थोरावडे, गजानन नाकील, बसवराज विभुते, निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे सचिव गजानन खापे, सुनील पाटील (कऱ्हाड ), आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Establishment of Welfare Board for rickshaw pullers; Request 'RTO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.