कोल्हापूर : बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान  :  महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:15 PM2018-06-11T17:15:30+5:302018-06-11T17:15:30+5:30

‘तुम्ही अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाचे काम भक्तीने करतात. त्यातच येथील चैतन्य व आनंदमयी वातावरण आणि नात्याप्रमाणे वागणूक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आपणाला मिळते. त्यामुळे बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी येथे व्यक्त केले.

Kolhapur: Even though you are a prisoner, you are lucky: Mahesh Jadhav | कोल्हापूर : बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान  :  महेश जाधव

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे लाडू तयार करणाऱ्या बंदिजनांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते कारागृहात करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शरद शेळके, शिवाजी जाधव, संगीता खाडे, विजय पोवार आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देबंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान  :  महेश जाधव मध्यवर्ती कारागृहातील लाडू करणाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : ‘तुम्ही अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाचे काम भक्तीने करतात. त्यातच येथील चैतन्य व आनंदमयी वातावरण आणि नात्याप्रमाणे वागणूक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आपणाला मिळते. त्यामुळे बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी येथे व्यक्त केले.

ते लाडू तयार करणाऱ्या बंदिजनांच्या सत्कारप्रसंगी कारागृहात सोमवारी बोलत होते. कारागृह अधीक्षक शरद शेळके अध्यक्षस्थानी होते. यावेळी बंदिजन महिलांना साडी, देवीचा प्रसाद, हळदी-कुंकू तर बंदिजनांना पँट, शर्ट, टॉवेल टॉपी व प्रसाद देऊन अशा ५५ जणांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी समितीचे सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महेश जाधव म्हणाले, येथील स्वच्छता आणि कारागृहातील वातावरण पाहिले तर ते प्रसन्नमय आहे. बंदीजन हे मन, तन लावून काम करतात. काही तरी कारणांमुळे ते शिक्षा भोगत आहेत. कारागृहातील शेती, जरीकाम, लाडू व बेकरीचे उत्पादन करणारा विभाग चांगला आहे.

समितीने कारागृहाला लाडू तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांचा सन्मान, सत्कार करणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडूचा आस्वाद घेतला आहे.

याचबरोबर पीठ तयार करणारे व तेल बाहेर पडणारे अशी दोन मशीनने सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे दिले आहे. त्यामुळे लाडूचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, मागेल ती मदत देऊ.


शरद शेळके म्हणाले, बंदिजनांचा केलेला देवस्थान समितीने सत्कार करून त्यांचा सन्मान केला. दोन वर्षांत २० लाख लाडू तयार करून दोन कोटी रुपये मिळाले. त्यातील ७० लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाले. आतापर्यंत लाडूबाबत कोणतीही साधी एक तक्रार आली नाही.

यासाठी प्रसारमाध्यमांचे चांगले सहकार्य लाभले. यावेळी कारागृहातील एफ.एम. विभागातर्फे लाडू प्रसादाचा माहितीपट सांगण्यात आला. याप्रसंगी प्रसादासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्यांचे अनावरण केले. यावेळी तुरुंग अधिकारी एस. एल. आडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी जाधवर, परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भविष्यात अंबाबाई मंदिरात सत्कार...

कारागृहातील बंदिजनांना अंबाबाई देवीचे दर्शन घडविण्यासाठी आणि त्यांचा सत्कार भविष्यात मंदिराच्या आवारात करू, त्यासाठी योग्य त्या प्रशासकीय परवानग्या घेऊ , असे महेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

 

 

Web Title: Kolhapur: Even though you are a prisoner, you are lucky: Mahesh Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.