कोल्हापूर : बारावीची उत्तरपत्रिका तपासणीस शुक्रवारपासून प्रारंभ, गुरुवारी नियामकांच्या सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 08:13 PM2018-03-06T20:13:05+5:302018-03-06T20:13:05+5:30
कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी मंगळवारी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी मंगळवारी सांगितले.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावरील बहिष्कार सोमवारी मागे घेतला. बारावीचे नऊहून अधिक पेपर झाले आहेत. त्यांच्या सुमारे दहा लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करावयाची आहे.
या बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला उशिरा सुरुवात होणार आहे. मात्र, शिक्षक महासंघाने अतिरिक्त काम करून उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासित केले आहे.
उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत कोल्हापूर विभागातील नियामकांची बैठक गुरुवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची सुरुवात होईल. दहावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू असल्याचे विभागीय सचिव पवार यांनी सांगितले.