कोल्हापूर : शालेय बास्केटबॉल स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा धमाका
By Admin | Published: September 24, 2014 12:51 AM2014-09-24T00:51:24+5:302014-09-24T00:51:47+5:30
१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद तर १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने शहर उपविजेतेपद पटकावले.
कोल्हापूर : शालेय बास्केटबॉल स्पर्धेत शांतिनिकेतन स्कूलच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने, तसेच १७ व १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले, तर १४ वर्षांखालील मुलींच्या व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये या शाळेच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत सलग आठ वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयावर मात केली. १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात सलग १२ वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या वि. स. खांडेकर विद्यालयाला पराजित करून विजेतेपद पटकाविले. १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले; तर १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने शहर उपविजेतेपद पटकावले.
विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनीषा पाटील, मुख्याध्यापिका गीता शेट्टी, शिल्पा वणकुद्रे आणि प्रशासक शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक संदीप खोत आणि क्रीडाशिक्षकांचे सहकार्य लाभले.
शालेय बास्केटबॉल स्पर्धेतील शांतिनिकेतन स्कूलच्या १९, १७ व १४ वर्षांखालील मुला - मुलींच्या संघासोबत प्राचार्या जयश्री जाधव व शिक्षक. २३ कोल - शांतिनिकेतन