कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:17 PM2018-11-09T14:17:34+5:302018-11-09T17:43:18+5:30
पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.
धामोड/कोल्हापूर : पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.
या घटनेबद्दलची अधिक माहिती अशी केरबा म्हादू पाटील हे आपल्या 'पलंगीचा माळ ' नावाचा शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते . गावाला लागूनच शेत व शेताला लागूनच जंगल असल्याने लोकांना गव्याचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागत असतो.
पण असे असले तरी दिवसाच्या वेळी आजअखेर गव्यांनी कधीच दर्शन दाखवले नव्हते. आज मात्र केरबा पाटील हे सकाळी ११ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता. ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांचावर अचानक हल्ला चढवला . त्यांना काहीच कळण्याच्या आत पुन्हा -पुन्हा गव्याने धडक मारल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले .
त्यात त्यांचा मांडीवर तसेच छातीवर गव्याने जोरदार धडक दिल्याने बरगडीला गंभीर जखम झाली . ते गव्याचा धडकेने लांबवर फेकले गेल्याने डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ पूढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलवले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . दरम्यान दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.
सरदार पाटीलमुळेच केरबा जाधवांना जीवनदान
सरदार बाबू पाटील हा तरुण याच दरम्यान आपल्या शेताकडे ऊसाला पाणी देण्यासाठी चालला होता . तेंव्हा त्याला बांधाच्या कडेला कोणाच्या तरी कणण्याच्या( विव्हळणे )आवाज आला . त्याने त्या दिशेने तात्काळ धाव घेतली व घडला प्रकार त्याने पाहीला. हातातील पाणी जाधव यांच्या तोंडात घातले व क्षणाचाही विलंब न लावता गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना ही घटना सांगितल्यांनेच केरबा जाधवांना प्राण वाचले, अन्यथा अनर्थ घडला असता.