Kolhapur- शेतकरी संघ निवडणूक: माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा अर्ज अवैध

By राजाराम लोंढे | Published: December 27, 2023 05:47 PM2023-12-27T17:47:48+5:302023-12-27T17:49:15+5:30

शेतकरी संघाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी विविध गटांतून २९२ जणांनी ३३२ अर्ज दाखल

Kolhapur Farmers Union Election: Former president Yuvraj Patil's application invalid | Kolhapur- शेतकरी संघ निवडणूक: माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा अर्ज अवैध

Kolhapur- शेतकरी संघ निवडणूक: माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा अर्ज अवैध

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व ‘गोकुळ’चे संचालक युवराज दत्ताजीराव पाटील यांच्यासह माजी संचालक एम. एम. पाटील (दिगवडेकर) यांचा शेतकरी संघासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरण्यात आले. भूविकास बँकेची थकबाकी असताना शेतकरी संघाची निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांना सहकार विभागाने अपात्र ठरवले होते.

शेतकरी संघाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी विविध गटांतून २९२ जणांनी ३३२ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात, यामध्ये युवराज पाटील, एम. एम. पाटील यांच्यावर यशोधन शिंदे यांनी हरकत घेतली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली आणि बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी अर्ज अवैध ठरवल्याबाबतचा निकाल दिला. त्याचबरोबर, जयसिंग हिर्डेकर हे ज्या संस्थेचे प्रतिनिधीत्व संघात करतात ती संस्था थकबाकीदार नसल्याने त्यांचा अर्ज वैध ठरण्यात आला.

Web Title: Kolhapur Farmers Union Election: Former president Yuvraj Patil's application invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.