कोल्हापूर महोत्सवात हंगेरियन, स्वीडनच्या दिग्दर्शकांना आदरांजलीपर चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:59 PM2017-12-13T16:59:50+5:302017-12-13T17:11:46+5:30
सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगलादेश, अफगाणिस्तान, सर्बिया, इस्रायलच्या चित्रपटांचा समावेश आहे.
कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगलादेश, अफगाणिस्तान, सर्बिया, इस्रायलच्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि डॅनिश दिग्दर्शिका सुसेन बीअर यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
अमोल पालेकर, संध्या गोखले यांच्याशी संवाद
या महोत्सवात अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अमोल पालेकर यांच्या ‘थांग’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे. यानिमित्ताने अमोल पालेकर आणि कथा लेखिका संध्या गोखले हे रविवारी (दि. १७) प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
महोत्सवात दाखविण्यात येणारे विभागवार चित्रपट :
जागतिक विभाग : द हाऊस आॅफ द फोर्टीफर्स्ट स्ट्रीट, झाशांक अँड परांद, नाईट शिफ्ट, ट्रेजेडी, हाऊरा, टॉकिंग वुईथ द विंड, ओरांजा, भागशेष, लेटर टू द प्रेसिडेंट, सेकंड मिटिंग, टेस्ट आॅफ ड्रीम, प्रोफेसर कोस्टा विजूज हॅट, व्हाय हॅटस फॉर, दाऊ फॉर सेकंद.
विविध भारती : गुहामानव (बंगाली), रेव्हिलेशन (तमिळ), पिंकी ब्युटी पार्लर (हिंदी), मरावी (मल्याळम), साऊंड आॅफ सायलेन्स (पहाडी), झरतुष्ट्र (इंग्रजी).
लक्षवेधी देश : प्रोफेट, आॅन द पिसफुल पिंक, यलो कव्हर आॅन द ग्रीन ग्रास (व्हिएतनाम).
माय मराठी विभाग : पिंपळ, कॉपी, सर्वनाम, लेथ जोशी, ड्राय डे, पल्याडवासी, माझं भिरभिरं, सायरन (नवीन मराठी चित्रपट).
दिग्दर्शक मागोवा : वास्तुपुरुष, संहिता (लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे), आफ्टर वेडिंग, ब्रदर, लव्ह इज आॅल यू नीड (डॅनिश दिग्दर्शिका सुसेन बीअर )जन्मशताब्दी वर्षानिमित्त.
आदरांजली विभाग : फाब्री यांचा टू हाफ टाईम्स इन हेल्थ (हंगेरियन दिग्दर्शक झोल्टन), वाईल्ड स्ट्रॉबेरीज (स्वीडनचे दिग्दर्शक इगमन बर्गमन).
श्रद्धांजली : जाने भी दो यारो (ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शहा), कलयुग (ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शशी कपूर).
लघुपट : विन्या, चाफा, स्क्रॅच, दोरंगा, नॉट इन माय नेम, डेरु, लव्हाळ, आस, जाणीव, पहावा विठ्ठल, देही, जलम, फिर वही सुबह, मुंगा, चव, सफर, अनाहूत, अनुभूती, गोंदण विठूरायाचे (कथात्मक), व्हॉईसलेस मेलडीज, ठिय्या, पश्चिमा (अकथात्मक).