कोल्हापूर : अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:06 PM2018-08-17T14:06:07+5:302018-08-17T14:08:13+5:30
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस्थांनी केली.
कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस्थांनी केली.
या मागणीचे निवेदन त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले. याबाबत वरिष्ठांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. अमृतकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हटले आहे, १ आॅगस्टपासून अक्षय आजारी होता. त्याला रक्ताची उलटी झाली होती. तरीही तुरुंगातील अधिकाºयांनी ते गांभीर्याने घेतले नाही. डॉक्टरांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर १० आॅगस्टला त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
कारागृह प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू, असेही जयसिंग कोंडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रहिम सनदी, प्रणव चौगुले, विशाल तिवले, जय साळुंखे, स्वप्निल सरनाईक, सागर ईळके,संदीप जाधव, आशितोष सातपुते यांच्यासह अक्षयचे मित्र, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.