कोल्हापूर महापूर : महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना किणी ग्रामस्थांनी दिले जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 05:12 PM2019-08-08T17:12:35+5:302019-08-08T17:16:40+5:30
महापुराच्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशी ही बंद राहिल्याने किणी येथे थांबविण्यात आलेल्या वाहनांतील अडकुन पडलेल्या हजारो प्रवाशांची चहा नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी किणीसह,वाठार, पेठवडगांव, भादोले, सह पंचक्रोशीतील हजारो नागरीकांचे हात सरसावले.
किणी/कोल्हापूर - महापुराच्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशी ही बंद राहिल्याने किणी येथे थांबविण्यात आलेल्या वाहनांतील अडकुन पडलेल्या हजारो प्रवाशांची चहा नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी किणी सह,वाठार, पेठवडगांव ,भादोले , सह पंचक्रोशीतील हजारो नागरीकांचे हात सरसावले .तर या मदतकार्याने प्रवांशी भारावुन गेले आहेत .
महापुरामुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने काल किणी टोलनाक्यावर वाहने थांबवून ठेवण्यात आली पहाटेच्या वेळी वाहणे थांबविण्यात आल्याने यामध्ये सहाजीकच ट्रव्हल्सची मोठ्या प्रमाणात असल्याने बंगलोर, बेळगांव, गोवा ,पुण्या मुंबईच्या अश्या लांबचे प्रवाशी असुन यामध्ये लाहन मुले, महिला ,अबाल व्रृद्धाचा समावेश मोठ्या संख्येने आहे घरापासून शेकडो किलोमीटर अंतरावर अडकुन भररस्त्यात अडकुन पडल्याने सैरभैर झाले होते, त्यातच मुसळधार पाऊस, अश्या अवस्थेत असतानाच या सर्वांना किणी हायस्कूल मध्ये हलविण्यात आले, आज दुसऱ्या दिवशीही आहे त्याच ठिकाणी राहवे लागत असल्याने दुध नाष्टा सह जेवणाची सोय करण्यासाठी किणी पेठवडगांव, भादोले येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदतीसाठी धावून आले आहेत. यांच्या सह महामार्गावर मोठ्या संख्येने वहानाच्या रांगा लांबच्या लांब लागल्या आहेत यांनाही जाग्यावर जेवण चहा आदी पोहच करण्यात येत आहेत.
५ ट्रॅव्हल्स चालक, प्रवाशाना मदत
किणी टोलनाक्यावर अडविण्यात आलेल्या वाहनांमधील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ३० ते ३५ ट्रँव्हल्स प्रवाशांसह किणी हायस्कूल मध्ये सायंकाळी करण्यात आली आहेत.
पहाटे तीन वाजता किणी टोलनाक्यावर महामार्ग बंद करण्यात आले नंतर दिवसभर वाहनांच्या सह प्रवाशी रस्त्यावरच अडकुन पडले होते त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे व रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची चिन्हे दिसत नाही म्हटल्यावर प्रशासनाने महामार्गावरील प्रवाशी सुरक्षीतस्थळी हलविण्याचा निर्णय घेऊन किणी हायस्कूलच्चा इमारती मध्ये स्थलांतरित करण्यात आले यामध्ये ट्रव्हल्सची संख्या ३० ते ४५असुन ५०० ते ६०० प्रवाशी आहेत यांच्या राहण्याची व चहा जेवणाची व्यवस्था कर किणी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत कार्य सुरू ठेवले आहे.