कोल्हापूर पर्यटकांनी बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:44+5:302020-12-28T04:13:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सलग मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कोल्हापूर शहर राज्यासह परराज्यातील पर्यटकांच्या जथ्यांमुळे अक्षरश: बहरले आहे. ...

Kolhapur flourished with tourists | कोल्हापूर पर्यटकांनी बहरले

कोल्हापूर पर्यटकांनी बहरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सलग मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कोल्हापूर शहर राज्यासह परराज्यातील पर्यटकांच्या जथ्यांमुळे अक्षरश: बहरले आहे. अशा प्रकारे सुमारे वर्षभरानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक, शहरात प्रवेश करणाऱ्या स्टेशन रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे.

सलग सुट्यांमधील तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी पहाटेपासूनच करवीरनिवासानी अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. कोरोना संसर्गामुळे राज्यासह परराज्यातील कंटाळलेले पर्यटक सुट्यांचा मुहूर्त साधून कोल्हापुरात दाखल झाले आहेत. प्रथम आई अंबाबाईचे दर्शन, त्यानंतर जुना राजवाडा येथील भवानीमातेचे दर्शन, त्यानंतर नवीन राजवाडा (न्यू पॅलेस), त्यानंतर जोतिबा, किल्ले पन्हाळगड, नृसिंहवाडी, ख्रिद्रापूर, गगनबावडा, कणेरी, सरतेशेवटी रंकाळा तलाव... अशा विविध ठिकाणी भेट देत आहेत. कोरोना विषाणूवर लस आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी, चप्पल लेन, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड आदी परिसरात पर्यटकांचे जथेच्या जथे फिरताना दिसत आहेत. याशिवाय पर्स, नेकलेस आदी साहित्याची खरेदी करतानाचे चित्र होते. कोल्हापुरातील पर्यटन पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा रत्नागिरी, गणपतीपुळे, मालवण, गोवा आदी प्रवासाकडे अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-राधानगरी या मार्गावर वाहनांची गर्दी दिसत आहे.

चौकट

कोल्हापूरच्या पदार्थांवर ताव

कोल्हापूर म्हटले की खवय्यांचे शहर म्हणून राज्यासह परराज्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे कोल्हापुरी मिसळ, वडापाव, तांबडा, पांढरा, व्हेज कोल्हापुरी अशा पदार्थांची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये गर्दी केली होती. गर्दीमुळे हाॅटेलबाहेर प्रतीक्षा करणारे पर्यटक... असे चित्र रविवारी दिवसभर होते. गुळाच्या एक किलोच्या ढेपा आणि कोल्हापुरी चपलांची खरेदीही मोठ्या प्रमाणात करताना पर्यंटक दिसत होते.

फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०१,०६

ओळी :

सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापुरातील बिंदू चौकात पर्यटकांच्या वाहनांमुळे रविवारी सकाळी असे वाहतुकीचे चित्र होते.

फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०२

ओळी :

सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच बिंदू चौकातील पार्किंग असे फुल्ल झाले होते.

फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०३

आेळी : सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कोल्हापूरातील जोतीबा रोड पर्यटकांच्या गर्दीमुळे असा फुलला होता.

फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०४

ओळी :

सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी अशी भली मोठी रांग लागली होती.

फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०५

ओळी :

सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापुरातील माळकर तिकटी येथेही वाहतूक व्यवस्थेची अशी अवस्था झाली होती.फोटो : २७१२२०२०-कोल-कोल्हापूर दर्शन ०६

ओळी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर अशा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

(सर्व छाया : नसीर अत्तार)

Web Title: Kolhapur flourished with tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.