कोल्हापूर : गंभीर गुन्हे दाखल असलेले चार सराईत गुंड जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:53 PM2018-04-06T16:53:57+5:302018-04-06T16:53:57+5:30
खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.
कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.
संशयित टोळीप्रमुख गौरव अशोक भालकर (वय २८, रा. सरनाईक मळा, सम्राटनगर), ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर) अशी त्यांची नावे आहेत.
ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)
ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर)
अधिक माहिती अशी, आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.
नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)
शहरासह ग्रामीण भागात गावपातळीवर नागरिकांच्या बैठका घेऊन समाजप्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यातील उपद्व्यापी सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.
नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर)
राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड गौरव भालकर व त्याच्या साथीदारांची दहशत आहे. खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये या संशयितांचा हात असल्याने त्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिला होता.
संशयितांचे रेकॉर्ड गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिले. त्यानुसार या चौघांना नोटीस देऋन जिल्हा सोडण्यास भाग पाडले. ज्या जिल्ह्यात ते वास्तव करतील तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही दिले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.