कोल्हापूर : बालचमूने लुटला ‘फन फेअर’चा आनंद, गेम शोमध्ये मुलांसोबत पालकही सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:16 PM2018-10-04T17:16:07+5:302018-10-04T17:19:42+5:30
डोरेमॉन, छोटा भीम या आवडत्या कार्टूनसोबत मजा, संगीताच्या तालावर मुलांसोबत पाण्यामध्ये थिरकणारे पालक अशा उत्साही वातावरणात ‘बाल विकास मंच’चे हजारो सदस्य व पालकांसाठी मंगळवारची सुटी अविस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘ड्रीमवर्ल्ड’मध्ये आयोजित ‘फन फेअर’चे.
कोल्हापूर : डोरेमॉन, छोटा भीम या आवडत्या कार्टूनसोबत मजा, संगीताच्या तालावर मुलांसोबत पाण्यामध्ये थिरकणारे पालक अशा उत्साही वातावरणात ‘बाल विकास मंच’चे हजारो सदस्य व पालकांसाठी मंगळवारची सुटी अविस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘ड्रीमवर्ल्ड’मध्ये आयोजित ‘फन फेअर’चे.
‘लोकमत बाल विकास मंच’च्या सन २०१८-१९ बालचमूंसाठीही खास पर्वणी ठरली. दुपारी दोन वाजल्यापासून बालचमू बैलगाडी, घोडेस्वारी, मिनी ट्रेन सारख्या खेळांचा आनंद घेण्यात दंग झाला. नंतर पालकांसोबत वॉटर गेमही खेळले. सभागृहात कठपुतळी आणि जादूच्या प्रयोगाने सर्वांना पोट धरून हसायला लावले.
राजस्थानी या पारंपरिक नृत्यावर सर्वांना ठेका धरला. ज्युनिअर शक्तीकपूर पी. कुमार यांनी मिमिक्री करून सर्वांनाच अचंबित केले आणि हसविलेही.
गायक जितू पाटील आणि मोहसीन शेख यांनी मुलांबरोबरच पालकांच्या फर्माईश पूर्ण करीत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी झालेल्या गेम शोमध्ये पालकही मुलांसोबत सहभागी झाले. दिवस सरल्यानंतर मुलांच्या निमित्ताने स्वत:ही केलेल्या धम्माल आठवणी परत नेल्या.
वाढत्या शहरीकरणात बैलगाडीची सफारी ही गोष्ट आता दुर्मीळ झाली आहे. शहरातील मुलांना ही बैलगाडी फक्त चित्रात किंवा टीव्हीवर दिसते. मात्र या फन फेअरने मुलांना बैलगाडीच्या सफारीचा अनुभव दिला.
मी मुलासोबत फन फेअरमध्ये सहभागी झाले होते. यानिमित्ताने मुलाला मला एक वेगळा अनुभव देता आला. आम्ही दोघांनीही खूप धमाल तर केलीच; शिवाय त्याला नवीन मित्रही मिळाले. ‘लोकमत बाल विकास मंच’च्या उपक्रमांमुळे घर आणि शाळेव्यतिरिक्त मुलांना काहीतरी नवीन देण्याचा आनंद मिळतो.
- प्रतिमा ठाकूर (पालक )
मी ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये खूप धमाल केली. पाण्यात खेळले. बैलगाडीत आणि घोड्यावर बसले. मिनी ट्रेनमधून सफर केली. मॅजिक शो, राजस्थानी, कठपुतळी डान्स पाहिला. थँक यू बाल विकास मंच.
- क्षणया सूर्यवंशी (बाल विकास मंच सदस्य )