कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:05 PM2018-06-26T19:05:50+5:302018-06-26T19:07:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि. २५) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस गगनबावडा, तर ६९ मिलिमीटर पाऊस राधानगरी तालुक्यात झाला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली आहे.