कोल्हापूर : विद्यार्थिनींना मोफत पास द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी; एस.टी. प्रशासनाकडे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 06:59 PM2018-07-07T18:59:59+5:302018-07-07T19:04:27+5:30
अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली.
कोल्हापूर : अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास योजना लागू असताना, अनेक आगारांतून विद्यार्थिनींना मोफत प्रवास पास दिला जात नाही; त्यामुळे या विद्यार्थिनींना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही योजना सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील म्हणाले, अनेक आगारांत विद्यार्थिनींना मोफत पास नकार देत आहेत. मराठी, सेमी-इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासह सीबीएसई माध्यमातील विद्यार्थिनींना वेठीस धरले जात आहे.
याबाबत प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून तत्काळ या मुलांना मोफत पास देण्यास सुरुवात करावी. याप्रसंगी विनायक पाटील, राज मकानदार, मदन परीट, अजय शेडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.