एका तासात गोवा; कोल्हापूर-गोवा आज विशेष विमान सेवा, बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:19 PM2024-09-19T12:19:50+5:302024-09-19T12:20:19+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर - गोवा -कोल्हापूर हे विशेष विमान आज, गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ...

Kolhapur Goa today special flight service, booking full | एका तासात गोवा; कोल्हापूर-गोवा आज विशेष विमान सेवा, बुकिंग फुल्ल

एका तासात गोवा; कोल्हापूर-गोवा आज विशेष विमान सेवा, बुकिंग फुल्ल

कोल्हापूर : कोल्हापूर-गोवा-कोल्हापूर हे विशेष विमान आज, गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार व रविवारी (दि. २२) विशेष विमानसेवा चालविण्यात येणार आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात येणार आहे. 

आज, गुरुवारी सकाळी ११:३० वाजता हे विमान कोल्हापूर विमानतळावरून गोव्यासाठी उड्डाण करेल. ते गोव्यातील मोपा विमानतळावर १२:३० वाजता पोहोचेल. गुरुवारी दुपारी १ वाजता मोपा विमानतळावरून उड्डाण केलेले विमान कोल्हापुरात दुपारी २ वाजता पोहोचेल. स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. एका तासात गोव्याला पोहोचता येणार असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या कोल्हापूर-गोवा विमानाचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

Web Title: Kolhapur Goa today special flight service, booking full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.