कोल्हापूर : टेंबलाईवाडीतील धान्य बाजार अखेर बारा वर्षांनंतर फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:17 AM2019-01-09T01:17:03+5:302019-01-09T01:17:40+5:30

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी बाजार मंगळवारी सुरू झाला. व्यापाºयांनी लक्ष्मीपुरी ते टेंबलाईवाडीपर्यंत टेम्पोची रॅली काढून उत्साहात बाजारात प्रवेश केला. टेंबलाईवाडी उपबाजार उद्घाटनावरून गेले आठ दिवस बाजार समितीत नाट्य रंगले होते;

Kolhapur: The grain market in Tembaliwadi was full after twelve years | कोल्हापूर : टेंबलाईवाडीतील धान्य बाजार अखेर बारा वर्षांनंतर फुलला

कोल्हापूर : टेंबलाईवाडीतील धान्य बाजार अखेर बारा वर्षांनंतर फुलला

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनीच केले उद्घाटन : लक्ष्मीपुरी ते टेंबलाईवाडी रॅली काढून केला प्रवेश

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी बाजार मंगळवारी सुरू झाला. व्यापाºयांनी लक्ष्मीपुरी ते टेंबलाईवाडीपर्यंत टेम्पोची रॅली काढून उत्साहात बाजारात प्रवेश केला.
टेंबलाईवाडी उपबाजार उद्घाटनावरून गेले आठ दिवस बाजार समितीत नाट्य रंगले होते; त्यामुळे उद्घाटन होणार की नाही, याबाबत साशंकता होती. व्यापाºयांनी ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता लक्ष्मीपुरी येथून टेम्पो व ट्रकची रॅली काढून उपबाजाराकडे रवाना झाले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅली स्टेशनरोड, ताराराणी चौकमार्गे टेंबलाईवाडी मंदिर परिसरात आली. तिथे टेंबलाईला पाणी घालून रॅली उपबाजाराकडे रवाना झाली. रॅली पोहोचण्यासाठी साडेतीन तासांचा वेळ लागला.
चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते उपबाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना शेटे म्हणाले, पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या प्रयत्नामुळे बाजार स्थलांतरित होण्यास मदत झाली. उर्वरित व्यापारी टप्प्या-टप्प्याने येथे येतील. आम्हालाही लक्ष्मीपुरीतील दगदग नको आहे, येथे यायचे आहे. तोपर्यंत टेम्पोबाबत पोलीस यंत्रणेने थोडे दुर्लक्ष करावे.
पोलीस निरीक्षक अनिल गुजर म्हणाले, बाजार स्थलांतरित करण्यासाठी बाजार समितीचे मोठे सहकार्य लाभले असून, येथे कायमस्वरूपी चार पोलीस कर्मचारी ठेवणार आहे; त्यामुळे व्यापाºयांनी घाबरण्याचे कारण नाही. लक्ष्मीपुरीपेक्षा येथे व्यापार निश्चितच बहरेल. नयन प्रसादे यांनी स्वागत केले. विवेक शेटे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रेन मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे, नगरसेवक कमलाकर भोपळे, प्रदीप कापडिया, अभय अथणे, धर्मेंद्र नष्टे, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, वैभव सावर्डेकर, संजय जंगम, राजेंद्र कापसे, अमोल नष्टे, संजय परीख, बलराज निकम, आदी उपस्थित होते.

स्थानिक महिलांनी केले स्वागत
रॅली उपबाजारात आल्यानंतर परिसरातील महिलांनी व्यापाºयांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. येथून मागे झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करत नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी धान्याच्या कणालाही धक्का लागणार नाही, पण परिसरातील महिला व पुरुषांना काम द्यावे, असे आवाहन केले.

गुजर, सावर्डेकरांचा सत्कार
लक्ष्मीपुरी बाजार स्थलांतरित करण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी प्रयत्न केल्याबद्दल तसेच टेंबलाईवाडी येथे पहिल्यांदा बांधकाम करणारे वैभव सावर्डेकर, सहायक फौजदार राजाराम थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.

बारा वर्षांनंतर बाजार फुलला
समितीने टेंबलाईवाडी येथे २००४ ला प्लॉट पाडले, त्याची २००६ ला विक्री केली. २००८ ला व्यापाºयांनी ताबा घेतला; पण स्थलांतराला अनेक अडचणी आल्या, तब्बल
१२ वर्षांनंतर तिथे बाजार फुलल्याची चर्चा व्यापाºयांमध्ये होती.

लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरात एकही अवजड वाहन फिरकले नाही. शहराबाहेरच ही वाहने विक्रमनगर परिसरात थांबून राहिली. व्यापारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. अवजड वाहनांना दिवसभरात प्रवेशबंदी आहे.


बाजार समिती अलिप्तच
समितीच्या उपबाजाराचे उद्घाटन असताना समिती व्यापारी प्रतिनिधी सोडले, तर एकही संचालक किंवा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते.

१) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या टेंबलाईवाडी उपबाजाराचे मंगळवारी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नंदकुमार वळंजू, अनिल गुजर, किशोर तांदळे, प्रदीप कापडिया, सदानंद कोरगावकर, नयन प्रसादे, आदी उपस्थित होते. २) धान्य व्यापाºयांनी शहरातून टेम्पो, ट्रकची रॅली काढली.

Web Title: Kolhapur: The grain market in Tembaliwadi was full after twelve years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.